कौठा येथे दत्त जयंती महोत्सव सोहळा व अखंड दत्तनाम सप्ताह उत्साहात संपन्न

 

कौठा प्रतिनिधी -( प्रभाकर पांडे )

कौठा ता.कंधार येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आनंद सांप्रदाय संस्थान कवठा यांच्या भक्ती सोजन्याने दत्त मंदीर येथे दत्त जयंती महोत्सव सोहळा व अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन दि. २०/१२/२०२३ ते २६/१२/२०२३ पर्यंत श्री सदगुरु १०८ स्वामी गंभीरबन महंत महाराज कोलंबी यांच्या कृपेने व गुरुभक्त अमरपदवासी गोविंदराव संभाजी देशमुख यांच्या ज्वलंत गुरुभक्ती प्रेरणेने सप्ताह सुरुवात करण्यात आला होता सप्ताहात
सकाळी बाळक्रिडा पारायण दुपारी महापूजा, ग्रंथवाचन सांयकाळी प्रवचन व रात्री किर्तन व भजनाचा कार्यक्रम यशस्वी पार पडला
आज दत्त जन्मोत्सवपर द.भ.प.बालाजीराव देशमुख गुरुजी कौठेकर यांचे दत्त जन्मावर किर्तन व नंतर लगेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .

 

या सोहळ्यास कौठा व परीसरातील भक्तांनी उपस्थिती लावली दत्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष लक्षण झटकवडे , गोविंद बरगले , बालाजी मुंडकर , शिवाजी मुंडकर , भुजंग मुंडकर ,बालाजी कंधारे , भगवान पाटील शिरुरकर , दत्ता पाटील जाकापुरकर , बसवंतराव देशमुख , प्रताप देशमुख ,चेअरमन सतिश देशमुख , किरण देशमुख सह आदीनी सोहळा यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले व गावातील सर्व समाज बांधवानी सहकार्य करून सोहळा यशस्वी पार पडण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *