देगलूर — आगामी काळात नांदेड जिल्हात भगवेमय करु असे अभिवचन शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ दादा पवार यांनी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक, युवासैनिक पदाधिकारी, विभागप्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख, आजी माजी प्रतिनिधी,बुथ प्रमुख आदींच्या मेळावा दि.27 डिसेंबर रोजी सकाळी 1 वाजता खुतमापुर येथे शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर यांच्या नेतृत्वाखाली ता.देगलूर येथे आयोजित मेळाव्यात बोलताना केले
यावेळी बोलताना शिवसेना सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील म्हणाले की, आगामी निवडणुकीत गद्दाराना गाडुन त्याच्या छाताडावर पाय देऊन राज्यात पुन्हा एकदा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा निश्चितच फडकू असे स्पष्ट प्रतिपादन भुजंग पाटील यांनी केले
.
यावेळी युवा नेते सुमंत थडके देगांवकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला
यावेळी त्यांना भगवी दस्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विधानसभा मतदारसंघातील नागरींक उपस्थित होते .