कंधार ; प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांच्या हस्ते कंधार येथील निवासस्थानी सामाजिक कार्यकर्ते मयुर कांबळे यांचा आज दि २८ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला .
नुकतेच लोहा येथिल निर्धार मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीत मा . सुजात साहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत
मयुर कांबळे यांनी जाहीर प्रवेश केला त्याबद्दल मयूरभाऊ कांबळे यांचा आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांच्या हस्ते कंधार येथील निवासस्थानी सत्कार करून राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी तालुका अध्यक्ष संतोष पाटील गवारे,महिला तालुका अध्यक्षा साधनाताई एंगडे,अविनाश आण्णा कंधारकर,रुपेश भाऊ कांबळे,सुधाकर भाऊ तुप्पेकर,सचिन भाऊ मंगनाळे,भारत भाऊ पांचाळ आदीचा यावेळी उपस्थिती होती .