कंधार ; प्रतिनिधी
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती ही सरकारची नवीन योजना असून बेरोजगारांना विविध उद्योग उभारण्यासाठी शासनामार्फत बँक सलग्न अनुदान देण्यात येणार असून या योजनेचा बेरोजगारांना लाभ घेता यावा म्हणून नांदेड जिल्हा उद्योग केंद्राकडून गुरुवार दिनांक 28 रोजी कंधार पंचायत समिती सभागृह येथे तालुक्यातील बेरोजगार महिला पुरुषांना नवीन व्यवसाय निर्माण करण्यासाठी कार्यशाळा व मेळावा घेण्यात आला.
राज्य शासनाच्या वतीने धोरणानुसार बेरोजगारांना स्वबळावर रोजगार निर्मिती करण्यासाठी शासनाकडून उद्योग संचालना आले .
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत या नवीन योजनेची अंमलबजावणी करण्यात आली या योजनेअंतर्गत उत्पादन सेवा उद्योग उभारण्यासाठी जवळपास 50 लाख रुपया पर्यंत बँक कर्ज सलग्न शासन अनुदान देण्यात येणार आहे याच ग्रामीण भागातील राखीव प्रवर्गासाठी 35 ते 40% तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 25% तर शहरी भागातील राखीव प्रवर्गास 25% तर सर्वसाधारण 15% अशी शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे शासन अनुदान उर्वरित रक्कम बँक बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळणार आहे अशा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी 18 ते 50 वर्षे असेल. विशेष म्हणजे प्रकल्पाची किंमत दहा लाखापेक्षा जास्त असेल तर अर्जदाराचे किमान सातवी पास असणे गरजेचे आहे आणि 25 लाखापेक्षा जास्तीचे प्रकल्प असेल तर किमान दहावी पास असणे आवश्यक आहे अशा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रानुसार संकेतस्थळावर अथवा नांदेड जिल्हा उद्योग केंद्र येथे भेट घेऊ शकता.अशा योजनेचा ग्रामीण व शहरी भागातील इच्छुकाने लाभ मिळावा म्हणून तालुका व गावनिहाय जिल्हा उद्योग केंद्र आणि बँक शाखेतर्फे कार्यशाळा घेतली जात आहे यामुळे इच्छुकांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा उद्योग केंद्र व विविध बँक शाखेतर्फे काय कार्यशाळा घेतली जात आहे यामुळे इच्छुकांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र व विविध बँकेतर्फे कंधार येथे घेतलेल्या मेळाव्यात करण्यात आले .
यावेळी महेश बी.किडे ( मॅनेजर, एसबीआय बँक कंधार ),सोमेश आठवले ( उद्योग निरीक्षक), गौरव यादव (उ.नि.), प्रफुल्ल कांबळे, सचिन कपाळे(ग्रा.पं.सदस्य मंगलसांगवी), महेश मोरे,अशोक पाटील चिखलीकर,अविनाश आंबटवाड, विकास गायकवाड आदी, मंगलसांगवी आलेगाव बारूळ चिखली बहादरपुरा माणसपुरी सावळेश्वर दाताळा औराळ, पांगरा शिराढोण नंदनवन धर्मापुरी वळसंगवाडी येलूर, उस्माननगर आदी ठिकाणचे महिला पुरुष व नवउद्योजक उपस्थित होते .