कंधार ; दिगांबर वाघमारे
एस टी महामंडळाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक पुरस्कार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याचे सव्हॅक्षण एसटी महामंडळाच्या अमरावती येथिल विभागीय पथकाकडून आज दि. 9 जानेवारी मंगळवारी दुपारी दोन वाजता च्या दरम्यान कंधार बस स्थानकाची पाहणी करण्यात आली.
एस टी महामंडळाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान हाती घेतले आहे या अभियानाची कालावधी मे 2023 ते एप्रिल 2024 एक वर्षाची असून या अभियानात राज्यातील 580 पेक्षा अधिक बस स्थानके सहभागी झाले आहेत यामध्ये कंधार व लोहा बस स्थानकाचा समावेश आहे यामुळे कंधार येथील बस स्थानक स्वच्छतागृह , बस स्थानक परिसर ,प्रवासी , बस आदी चे पाहणी अभियानाच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत अमरावती विभागाच्या पथकाकडून करण्यात आली यावेळी पथकाकडून स्वच्छते बद्दल व रंग-रुंगोटी आणि प्रवासी वाहतूक या बद्दल कौतुक केले .
राज्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस स्थानके स्वच्छ सुंदर व पर्यावरण पूरक करण्यासाठी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवण्यात येत आहे या अभियानात बस स्थानकाची विविध बाबीची आधारावर मूल्यांकन करून त्यांना पुरस्कार दिले जाणार आहे यावेळी बस स्थानक परिसरातील स्वच्छता पाहून अमरावती येथील पथकाकडून कंधार व लोहा बस स्थानक स्वच्छते बद्दल व रंग-रोंगोटी बद्दल येथील आगार प्रमुख अभय वाढवे व त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले आहे .
या पथकात अमरावती विभागाचे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे, उपयंत्र अभियंता अमरावती प्रविण अंबुलकर ,
विभागीय सांख्यिकी अधिकारी नितीन देशमुख यांच्यासह नांदेड विभागातील वाहतूक अधीक्षक श्री. संदीपकुमार साळुंकेसह विभाग कर्मचारी उपस्थित होते .