कंधार ;
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम नांदेड अंतर्गत कंधार नगरपालिका हद्दीतील शाळांची आरोग्य तपासणी आज दि 9 जानेवारी रोजी दुपारी एकच्या दरम्यान करण्यात आली. शहरातील महात्मा फुले विद्यालय संभाजीनगर नवा मोंढा येथिल विद्यार्थासह शहरातील अन्य शाळां र्चा तपासणी करण्यात आली अशी माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ लोखंडे दिलीप, पथक प्रमुख राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम नांदेड यांनी दिली
वैद्यकीय अधिकारी डॉ लोखंडे दिलीप, पथक प्रमुख राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम नांदेड यांच्या प्रमुख मार्गदशना खाली
कंधार तालुक्यातील नगरपालिका हदीतील सर्व शाळां व निमशासकीय शाळ तपासणी करण्यात आली
डॉ फरहाना नाहीद, वैभव इंगळे औषध निर्माण अधिकारी,. सौ महानंदा यलबुगडे एएनएम आदीची यावेळी उपस्थिती होती. मुख्याधापक जेजी केंद्रे यांनी आभार मानले.