कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत अवतरले प्रभू श्रीरामजी, लक्ष्मनजी सितामया,: वेशभुषेतून चिमुकल्यांनी लक्ष वेधले

 

आज दि 11 जानेवारी 2024 रोजी कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत वर्ग बालवाडीतील विद्यार्थ्यांची वेशभूषा कार्यक्रम घेण्यात आला.विद्यार्थ्यांनी भगवान श्रीराम (शिवमल्हार मदन कल्यानपाठ), लक्ष्मण (आरूष संतोष लाडेकर) व सीता माई (कु श्रावणी अमीत निळकंठे),आणि हनुमान( ईशान प्रदीप व्यास) व शब्बरी (कु सिद्धी संदीप शिंदे )यांची वेशभूषा धारण केली. त्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व शाळेच्या वतीने बक्षीस देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी जी, शिक्षिका उषा कागणे,आनंदा आगलावे, माणिक बोरकर, बालकताई चंद्रकला तेलंग आदी सह पालकांचे उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *