डाएट व्यायाम आणि थॉट प्रोसेस.

दुसऱ्या दिवशी सकाळी किती वाजता उठायचं आहे आणि कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा आहे याची थॉट प्रोसेस आदल्या रात्री झोपण्यापुर्वी सुरु व्हायला हवी म्हणजेच आपल्या मनातील विचाराना रात्रीच वॉर्मअप करायला सुरुवात करायची.. उद्या पहाटे ५ वाजता उठायचे आहे हे मेंदुला सांगितलं की अलार्मची गरजच भासत नाही तसच उद्या आहारात काय काय असायला हवं यासाठी सुध्दा आज विचार केला तर उद्या मिळणाऱ्या न्युट्रीशन साठी शरीर सज्ज होतं त्याचपध्दतीने ते काम करायला लागतं..
आहार हा ती व्यक्ती कुठे रहाते यानुसार ठरतो म्हणजेच प्रत्येक प्रांतानुसार आहार बदलतो आणि त्यानुसार आपलं शरीर बनतं पण व्यायामाचं तसं नाही .. व्यायाम हा शरीरानुसार बदलतो म्हणजेच प्रत्येक शरीराची ठेवण आणि आवड यानुसार त्या व्यक्तीने व्यायाम निवडावा.. एखाद्याला स्वीमींग आवडेल तर एखाद्याला जीम.. एखादा योगा करेल तर काहीना रनींग ने छान वाटतं.. प्रत्येक व्यायामाने शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात तसेच आहाराचे ही आहे. प्रत्येक अन्नघटकातुन वेगवेगळ्या प्रकारे शरीराचं पोषण होतं.. फक्त किती कधी कुठे आणि काय खावं हे माहीत हवं.. जेव्हा मी इंडीजीनस न्युट्रीशन शिकत होते त्यावेळी अनेक गोष्टी नव्याने शिकता आल्या..
जशी व्यायामाची प्रोसेस आदल्या रात्री सुरु होते तशीच कुकींगची सुरुवात ही त्या शिजवणाऱ्याच्या मानसिकतेवर खुप अवलंबून असते.. ती प्रोसेस सुध्दा भाजी विकत आणण्याच्या प्रोसेस पासून सुरु होते.. भाजी विकत घेताना नजरेसमोर ताट यायला हवं.. ज्या ताटात सगळे रंग असायला हवेत.. त्यात एक वाटी काहीतरी कच्चे हवे.. काही उकडलेलं हवं.. त्यात काही वाफवलेलं हवं.. त्यात काही शिजवलेलं हवं.. प्रत्येक आहारात प्रोटीन्स हवं.. पालेभाज्या , उसळी , डाळी यांनी सुशोभित असं ताट नजरेसमोर आलं की समजायचं शरीरही आपोआप सुडौल होइल..तयार अन्न एकतासात खाल्लं तर संपूर्ण न्युट्रीशन मिळतं.. नाहीतर त्याची न्युट्रीशन व्हॅल्यु कमी होत जाते..
माझ्या मैत्रीणीचा एक किस्सा सांगते..तिने जवळपास १५ किलो वजन कमी केलं पण आता तिला अशक्तपणा आलाय म्हणजेच काय तर तिच्या शरीराला हव्या असलेल्या न्युट्रीशन ची कमतरता आहे. ती घेत असलेला आहार वेळा याचा ताळमेळ नसावा.. अनेक उपवास करुन साबुदाणा खाऊन ज्याचा शरीराला उपयोगी नसलेलं अन्न खाऊन शरीर कुपोषित करुन वजन कमी करण्याचा काहीही उपयोग नाही.. म्ह उपवासाचं महत्वही माहीत असायला हवंआणि उपवासाच्या दिवशी काय खायचं हेही माहीत असायला हवं..

एकदम खुप वजन कमी केल्याने तिची त्वचाही सैल पडली त्वचा टाइटनींग ला जितकी व्यायामाची गरज आहे तितकीच ती पोषक आहाराची गरज आहे..
आहार , व्यायाम याकडे पहाण्याची आपली मानसिकता काय आहे यानुसार आपलं शरीर बनतं.. सगळ्यात महत्वाचं आपलं मानसिक आरोग्य उत्तम ठेउन सकारात्मक राहुन आहार आणि व्यायामाकडे एका वेगळ्या ॲंगल ने पहायला हवं ..सीझनल भाज्या , फळं याचा आहारत मुबलक वापर हवा.. आणि या सगळ्याचा लैगिकतेइतका किवा अध्यात्माइतका अभ्यासही हवा..

#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *