नांदेड जिल्हास्तरीय महायुती कार्यकर्ता मेळावा संपन्न !

 

नांदेड : शहरातील कौठा स्थित मातोश्री मंगल कार्यालयात नांदेड जिल्हा महायुती कार्यकर्ता मेळावा आज रोजी संपन्न झाला. सदर मेळाव्याच्या संयोजक पदाची जबाबदारी डॉ. संतुकराव हंबर्डे
जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नांदेड ग्रामीण महायुती कार्यकर्ता मेळावा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम माझ्यावतीने घेण्यात आले. याचेच फलीत म्हणून नांदेड जिल्हा व लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. ही निश्चितच समाधानाची बाब आहे. याबद्दल भाजपा शिवसेना
राष्ट्रवादी रिपाई शिवसंग्राम महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानले…

आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका महायुतीच्या माध्यमातून आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिंकण्याचा निर्धार सदर मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आला. शिवाय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री. मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा.श्री. अजितदादा पवार यांचे महायुती सरकार यशस्वीपणे वाटचाल करत असून विविध कल्याणकारी योजना आणून विकासाचे नवे वस्तुपाठ घालणाऱ्या महायुती सरकारला भक्कम करण्यासाठी सर्वांनी समर्पण भावनेतून काम करण्याचें आवाहन डॉ. संतुकराव हंबर्डे
जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नांदेड ग्रामीण यांनी आले.

सदर मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विक्रम काळे, भाजपा विधानपरिषद आमदार राम पाटील रातोळीकर, मुखेड विधानसभा सदस्य आमदार डॉ.तुषारजी राठोड, नायगाव विधानसभा सदस्य आमदार राजेशजी पवार, शिवसेनेचे नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजीराव कल्याणकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अजित गोपछडे, प्रदेश सचिव देविदास राठोड, माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, भाजपाचे उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, विश्वंभर पवार, जीवन घोगरे पाटील, आरपीआयचे प्रदेश संघटक विजय दादा सोनवणे ,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, आरपीआयचे महानगर प्रमुख धम्मपाल धुताडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, शहर प्रमुख तुलजेश यादव, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नितीन लाटकर, भाजपा जिल्हासरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, जिल्हासरचिटणीस डॉ.माधव पाटील उच्चेकर, राजेंद्र सिंघ पुजारी हरभजन सिंघ पुजारी, यांच्यासह भारतीय जनता पार्टी व महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

#DrSantukraoHambarde #BJPNanded #BJP4Maharashtra #BJP4IND #BJPMaharashtra #NandedLokSabha #mh26nandedkar #nanded #LokSabhaElections2024 #Loksabha2024 #Mahayuti #MahaVijay2024 #महाविजय2024 #भाजपा_नांदेड #भारतीय_जनता_पार्टी_नांदेड #mahayutiNanded #महायुती_नांदेड_जिल्हा_कार्यकर्ता_मेळावा
Narendra Modi J.P.Nadda Amit Shah Nitin Gadkari Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Bharatiya Janata Party (BJP)
@followers BJP Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Girish Mahajan Dr Tushar Rathod – तुषार राठोड Rajesh Sambhaji Pawar Poonam Tai Rajesh Pawar Shrikant Bharatiya Sanjay Kenekar – संजय केनेकर Ram Patil Ratolikar Ram Patil Ratolikar उमेश पाटील Umesh Patil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *