कंधार,:
कंधार आगारात रस्ते सुरक्षितता मोहीमेचे उध्दाघटन करण्यात आले असून यावेळी वाहने सुरक्षित चालवणे हे आपले कर्तव्य व कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी रस्ते सुरक्षितता मोहीम पालन करून अपघात टाळावा या सूचना व मार्गदर्शन कंधार पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले
सध्या धावपळीचे युगात वाहन चालवताना वाहन चालकांनी मोबाईल वापर करु नये व मद्यपान करून वाहने चालू नये यामुळे अपघात होऊ शकतात वाहने चालवताना शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे व आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण हानी टाळावी व रस्ते सुरक्षितता अभियान मोहीम पालन करावे असे आवाहन कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी कंधार आगारात उपस्थित चालक वाहक यांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना रस्ते सुरक्षित अभियान मोहिमाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आगार प्रमुख अभय वाढवे तर उद्घाटक म्हणून कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर उपस्थित होते यावेळी बीट जमादार गिरे , वाहतूक निरीक्षक जगदीश मटंगे सोनकांबळे आगार लेखाकार गीता अंबेकर वरिष्ठ लिपिक चंद्रकांत श्रीमंगले ज्ञानेश्वर कोंडा मंगले लिपिक बाळू केंद्रे पाळी प्रमुख जी डी गोणारे ब्रह्मा गीते आशिष जोगे भगवान चव्हाण यासह आगारातील चालक वाहक यांत्रिक प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.