कंधार : प्रतिनिधी
उपक्रमशील शिक्षिका सौ.अनिता दाणे झुंबाड यांना सत्यशोधक शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मापुरी तांडा तालुका कंधार येथे शाळेत भेट देत त्यांचा सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून शाळेच्या वतीने सत्कार केला.सामाजिक कार्यकर्त्या तथा उपाध्यक्षा नांदेड जिल्हा महिला काँग्रेस सौ. वर्षाताई भोसीकर, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मारुती पाटील पंढरे यावेळी उपसरपंच सूर्यकांत आमलापुरे, मुख्याध्यापक भगवानराव चव्हाण शालेय समिती सदस्य गजानन जाधव शिवाजी राठोड,शालेय विद्यार्थी उपस्थित होते.