मिञ हाे शहीद जवान संभाजी कदम हे आपल्याच नांदेड जिल्हातील लाेहा तालुक्यातील जानापुरीचे विर शहीद पुञ आहेत.आनि आपल्याच जिल्हातील आनि खास करुन लाेहा कंधार तालुक्यातील नेता गणांना शहीद जवाना विषयी किती आभिमान आहे.
2/3 महीन्यापासुन आम्ही माझी सैनिक शहीद संभाजी कदम चे नाव लाेहा येथील रुग्णालयास द्यावे म्हनुन धडपडत करत आहाेत पन ऐक ही नेता यावर बाेलत नाहीत किंवा ऐकादे निवेदन देवुन शिपारस केली नाही.का ?या नेता गणांना पक्त निवडनुकीच्याच काळात सर्व समस्या ऐकमेकांना विषय आदर आभिमान काेरडे पुळके आेले पुळके दिसतात का ?या शहीद जवानाचे नाव द्या म्हनुन नेत्यांनी शिपारस केली तर यांच्या राजकीय भविष्यात खुप माेठे नुकसान हाेईल का ?आरे जाे जवान भारत माते साठी लढा देत आसताे तेंव्हा ताे जात पात धर्म पाहुन लढा देत नसताे तर ताे पक्त भारतीय आहे म्हनुन आभिमान बाळगुन लडत आसताे.
जसे तुम्ही ईकडे प्रत्येक गाेष्टीवर जात पातीचे राजकार करुन आपली वाेट बँक बनवता.प्रत्येक मुद्दा हा वाेट बँकेसाठी बनवन्याचा प्रत्यन करता तसे जवानांने जर भारत मातेचे रक्षण करते वेळी केले तर काय हाेईल तुम्ही ऐक तास पन निवांत झाेपु शकत नाही.सैनिकाला कुटलीच जात धर्म नसताे मग ताे सेवारत आसेल या सेवा निवर्त आसेल किंवा देशासाठी शहीद झालेला आसेल.
त्यामुळे माझी नांदेड जिल्हातील आनि खास करुन लाेहा कंधार मधील नेता गणांना तमाम माझी सैनिकांकडुन हात जाेडुन विनंती आहे की आपन सर्वांनी पुढे येवुन शहीद संभाजी कदमचे नाव देन्यासाठी सहकार्य करावे.आम्ही सैनिक फक्त तिरंगा समाेरच नतमस्तक हाेत आसताे.पन आज आम्ही त्या तिरंगा ची आन बान शान वाचविन्यासाठी जाे आपले बलिदान दिले आनि शहीद झाले त्या शहीदासाठी नेते मंडळी पुढे नतमस्तक हाेत आहाेत
आनि शहीदाच्या बलिदानाची तुमच्या कडे भिक मागत आहाेत जर आपल्या मनामधे कुटे थाेडासा सैनिका विषयी आभिमान जिवंत आसेल तर करा मदत नाही तर शेवटी तुम्हची ईच्छा.पन लक्षात आसु द्या जे तिरंगा समाेर नतमस्तक हाेतात तेच आज तुमच्या पुडे शहीदासाठी नतमस्तक हाेत आहेत ! जय हिंद
आपलाच माझी सैनिक
बालाजी रामप्रसाद चुकलवाड
जिल्हा अध्यक्ष मा.सै.सं.नांदेड