१० सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस

——————

     आत्महत्या ही देशासमोरील एक गंभीर समस्या आहे.या समस्येवर वेळीच उपाय योजना करत ठोस पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे.१०सप्टेंबर हा “जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन”(world suicide prevention day)म्हणून साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वैक्षणानुसार दरवर्षी जगभरात सरासरी आठलाख व्यक्ती आत्महत्या करतात.त्यात एक लाख लोकसंख्येमाघे१६लोक तर प्रत्येक ४०सेंकदाला एक आत्महत्या होत आहे आत्महत्येच्या समस्येत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो ही चिंतनीय बाब आहे.       

   आत्महत्या करण्यामाघे अनेक कारणे असतात.आपल्या आजूबाजूला असे अनेकजण आहेत जे नैराश्याने ग्रासलेले आहेत.उदा.प्रेमभंग,विवाहबाह्य सबंध,विविध व्यसनांची चटक,परिक्षेत अपयश,बेरोजगारी,पोर्नोग्राफीच व्यसन,समलैगिंक सबंंध,लैंगिक अत्याचार या सर्व समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्ती खुप तणावामध्ये वावरतात.स्पर्धात्मक जगात आपलाही टिकाव लागावा म्हणून आज जो तो धडपडतोय.आधुनिक जगात कोणी काॅर्पोरेट आयुष्यात यश मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावतेय.हे सर्व करतांना सूखी जीवनाची व्याख्या बदलत आहे.

ज्या प्रमाणे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात त्याप्रमाणे यालाही दोन बाजू आहेत.एक म्हणजे यश आणि दूसरे म्हणजे अपयश.यश काही सर्वांनाच मिळत नाही त्यामूळे नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग स्विकारला जातो.त्यामध्ये १८ते४५वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.आत्महत्येचा विचार करणा-या लोकांना इतरांना खुप काही सांगायच असत,

पण…अश्या व्यक्तींना मन मोकळ बोलण्यासाठी कुणीच नसत.त्यामूळे ते अधिक तणावग्रस्त होतात आणि जगण्यात काही आर्थ नाही या विचाराने ते मागचा पुढचा विचार न करता आत्महत्या करतात.अश्या वेळी आपण तणावग्रस्त व्यक्तीला समजून घ्या.तीचे बोलणे आपूलकीने ऐकूण घ्या.

शक्यतो मानसोपचार तज्ञ,डाॅक्टर,समुपदेशक यांची आवश्य मदत घ्या.तसेच आत्महत्या थांबवण्यासाठी नजीकच्या कार्यरत “हेल्पलाईनवर”त्वरीत संपर्क साधावा.त्याच्या मनातील विचार काढून टाकून जीवनाकडे सकारात्मक दृष्टिने पाहाण्यास भाग पाडा.पूर्वी आत्महत्या केल्यास गुन्हा दाखल केला जायाचा.परंतू नवीन कायद्यानूसार आत्महत्या हा गुन्हा नसुन शिक्षा देण्याऐवजी संबधिताला मानसिक उपचार दिले जातात.   

      आपल्या भारतामध्ये प्रेमभंगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.त्यामूळे वयात येणा-या मूली,मुलांना शरीरात होणा-या बदला विषयी समजून सांगावे,तसेच प्रेम आणी आकर्षण यातला फरक समजावून सांगून प्रेमभंगातून इतके सुंदर आयुष्य संपवू नये ही मानसिक स्थिती तयार करावी.सध्याच्या स्थिती मध्ये लहान मुलांना देखील आॅनलाईन अभ्यासासाठी नाईलाजास्तव मोबाईल हातात द्यावा लागतोय,परिणामी मुलांचे अभ्यासात लक्ष कमी आणि गेम खेळण्यात जास्त लागत,मूलं आई वडिलांच्या माघारी नको ती व्हिडीओ पाहातात.ह्या गोष्टी लक्षात आल्यावर पालक मोबाईल देण्याचे टाळतात,आणि मूलं मग टोकाचे पाऊल उचलतात.त्यामूळे फार कमी वयात तंत्रज्ञानाची ओळख न करु देणे हाच यावरचा प्रभावी उतारा आहे.     

   सध्यास्थिती मध्ये आत्महत्या या विषयावर समाजामध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे.विविध माहीतीपट,लघूपट च्या माध्यमातून आत्महत्या प्रतिबंधाविषयी जनजागृती केली जाते.तसेच नैराश्यग्रस्त व्यक्तीची मानसिक प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.कारण समाजामध्ये आत्महत्या करण्याच वाढत प्रमाण चिंताजनक आहे.खरतर नैराश्य हा एक प्रकारचा आजार आहे.आपण शरीराची काळजी अत्यंत घेतो पण,मनाची घेतो का?मनालाही व्याधी जडतात,जोपर्यंत एखादी प्रसीध्द  व्यक्ती आत्महत्या करुन आपले जीवन संपवते त्यावेळी मानसिक आरोग्याची चर्चा होते आणि तेव्हाच नैराश्याकडं मानसिक आजार म्हणून पाहिल जात.अती तणावामूळे मेंदूमध्ये सिरोटोनिन या रसायनाचे प्रमाण कमी होउन जो काही असमतोल निर्माण होतो  तो नैराश्याला कारणीभूत ठरतो.हे वैद्यकीय दृष्ट्या सिध्द झाले आहे.   

      जागतिक आरोग्य संघटनेनूसार “नैराश्य”हा सध्या चौथ्याक्रमाकांचा आजार आहे त्यामूळे नैराश्याकडे कानाडोळा करणे आत्मघातकी ठरु शकते.नैराश्य हा बरा होणारा आजार आहे.कृषी क्षेत्रातील संकटामूळे देशात महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या होतात त्या शेतक-याच्या कारण,शेतमालाला कमी भाव,नैसर्गिक संकटे,कर्जबाजारीपणा,यामूळे शेतकरी आर्थिक अडचणीत येतो आणि आत्महत्येचे पाऊल उचलतो…आत्महत्येमूळे जाणारा जातो पण,कुटूंबाला आयुष्यभराची वेदना देऊन जातो.त्यामूळे छोट्या छोट्या गोष्टीने खचून जाऊ नका…अपयशाला पचवायला शिका,प्रयत्न केल्यास तुम्हाला यश नक्की मीळेल.

रुपाली वागरे/वैद्यनांदेड

९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *