अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले धडाडीचे, निर्भिड पत्रकार प्रदीपकुमार कांबळे-

————————————–     

   आमचे सहकारी मित्र प्रदीप कुमार कांबळे यांचे नाव घेताच अनेकांच्या भुवया उंचावतात. प्रदीप कुमार कांबळे वागण्यात नम्रता, दिसण्यात शांतता, लिहिण्यात परखडता, बोलण्यात लीनता, कधीच कुणाच्या आमिषाला बळी न पडणारा, धारदार लेखणी च्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याची जाणीव करून देणारा फुले शिव शाहू आंबेडकर विचारधारेने चालणारा असे या परिसासमान पुत्राचा जन्म आई त्रिशलाबाई यांच्या उदरी वडील विक्रम कांबळे पेशाने शिक्षक होते खरोखर त्यांचे संस्कार सर्व भावंडांवर झाल्याचे दिसून येतात. 

     तसे पाहता प्रदीप कुमार कांबळे यांच्या घरात 80 टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याचा अनुभव संपूर्ण नांदेड जिल्ह्यालाच परिचित आहे. आई त्रीशलाबाई कांबळे ह्या 18 डिसेंबर 2008 ते 17 जून 2011 अशा अडीच वर्षाचा कालावधी शिवसेना पक्षाच्या प्रथम महिला नगराध्यक्ष म्हणून त्याची लोहा नगरपालिकेच्या इतिहासात नोंद झालेली आहे.  त्यांच्या कनिष्ठ बंधू  पंचशिल कांबळे हे विद्यमान नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते/गटनेते असून, एक बंधू सीमेवर देशाचे रक्षण करतात, अशा या परिवारात घरात राजकीय वातावरण असताना ही प्रदीपकुमार कांबळे हे सदैव लेखणीच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत निपक्षपाती पणे अंगीकारल्याचे दिसतात. 

    वारंवार समाजाचे प्रश्न उचलून धरताना, अन्यायावर मात करताना त्यांची धारदार लेखणी कुठेच कमी पडत नाही, “ना कधी कुणाच्या आमिषाला बळी पडले, ना कधी कुणाच्या दावणीला बांधले” सर्व सर्वसमावेशक अशी निर्भीड लेखणी करणारे समाजात ऐक्य प्रस्थापित करण्याचे कार्य त्यांच्या हातून आजतागायत घडलेले आहे.   

 प्रदीप कुमार कांबळे हे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्यानंतर लोकमत समूहामध्ये लोहा तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द गाजल्याने  सर्वसामान्य वाचकांचा आनंद नक्कीच द्विगुणित झालेला आहे. यापूर्वी दै.सम्राट मधील त्यांचे लिखाण अतिशय गाजलेले आहे. प्रदीप कुमार कांबळे यांची ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ अशी वाटचाल सर्व समाजाला आदर्श देणारीच ठरत आहे.   

    समाजात वावरत असताना जगावर आलेले महामारी चे संकट covid-19 कोरोना याच काळात ते शासन-प्रशासन यांना समाजहिताचे निर्णय घेण्यास, आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यात तिळमात्र ही मागे सरकले नाहीत. नुकताच यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानही झाला हा सन्मान इतरांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.   

   अशा या माझ्या सहकारी जिवलग मित्राला जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा..


     आपलाच सहकारी परममित्र     

 शिवराज पां.पवार पारडीकर       

मो. नं.9763296791

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *