विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ.अंजलीताई कानिंदे सत्यशोधक शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

 

नांदेड: (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या १९३ व्या जयंतीचे औचित्य साधून पहिला सत्यशोधक शिक्षक रत्न पुरस्काराने श्री.शिवाजी हायस्कूल कंधार च्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका सौ.अंजली कानिंदे( मुनेश्वर ) मॅडम यांना सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा १० जानेवारी 2024 रोजी प्रा.नरहर कुरुंदकर सभागृह पीपल्स कॉलेज नांदेड येथे संपन्न झाला.

सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांत
राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले जयंती निमित्त
सत्यशोधक शिक्षकरत्न सन्मान सोहळा 2024चेआयोजन‌करण्यात आले होते. कानिंदे मॅडमचे शैक्षणिक व सामाजिक कार्य पाहून केलेल्या निवडीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. याप्रसंगी आदरणीय मा.डाॅ. व्यंकटेश काब्दे (माजी खासदार )
मा.एस.जी.माचनवार (राष्ट्रीय अध्यक्ष BPSS)
मा.प्रा. लक्ष्मणराव हाके (राज्य मागासवर्ग आयोग सदस्य)
मा. बालाजी ईबितवार. इ. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *