कंधार :(संतोष कांबळे )
समाजातील प्रत्येक घटकांना न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारी संघटना म्हंजे युवा ग्रामीण पत्रकार संघ . दि. 17 वार बुधवार रोजी शासकीय विश्राम गृह तालुका लोहा येथे कंधार – लोहा तालुक्यातील पत्रकारांची संघटने मध्ये विविध पदे देऊन निवड करण्यात आली. यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय मा.श्री.गणेशजी कचकलवार साहेब व नांदेड जिल्हा चे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर पांडे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनियुक्त पदाधिकारी श्री.बाजीराव पाटील गायकवाड नांदेड जिल्हा उपाध्यक्ष, श्री व्यंकटी जाधव कार्याध्यक्ष नांदेड जिल्हा,किरण गोंड सचिव नांदेड जिल्हा, श्री माधव गोटमवाड अध्यक्ष कंधार तालूका, नरसिंग पेठकर कोषाध्यक्ष, श्री प्रदीप मुगावे सहसचिव कंधार तालूका, श्री अंकुश वाघमारे कार्याध्यक्ष कंधार तालूका, लोहा तालुका अध्यक्ष गोविंद पाटील मडकीकर,लोहा
तालुका उपाध्यक्ष सोपान जाधव,लोहा तालुका उपाध्यक्ष शिवहार गालफाडे, लोहा तालुका सचिव विशाल घंटे, लोहा तालुका कार्याध्यक्ष जावेद शेख यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या .
आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना सर्व जणांनी सर्वांचे ऋण व आभार मानीत युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे आपण आपले कार्य सर्वांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहाने सुरू ठेवू अशी ग्वाही दिली. पत्रकार संघातर्फे सर्वांना नियुक्ती पत्र देऊन पुष्पहार घालून सर्वांचा सत्कार करण्यात आला. सूत्र संचालन माधव गोटमवाड यांनी केले तर शेवटी गोविंद मोरे यांनी सर्वांचे आभार मानून सभेची सांगता केली.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.