अहमदपूर : काळेभाऊ स्मृती प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने ९ व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे आयोजन अहमदपूर जी लातूर येथे दि.२० व २१ जानेवारी २०२४ ला करण्यात आले आहे.त्या निमित्ताने आमचे मित्र, मार्गदर्शक बौद्ध महासभेचे नेते शेषेराव ससाने गुरूजी हे संमेलनाची पत्रीका घेऊन घरी आले. पत्रीका आधीच वाटस्प वर मिळाली होती तशीच अहमद तांबोळी कडून ही मिळाली होती.पण या निमित्ताने सर घरी आले व साहित्याच्या सोबतच अनेक विषयांवर त्यांच्या सोबत मनमोकळे पणे गप्पा मारल्या.गप्पाच्या ओघात ससाने गुरूजीनी खरे तर हे साहित्य संमेलन म्हणजे साहित्य प्रेमी नागरिका साठी एक अपूर्व पर्वणी असल्याचे सांगून
हे संमेलन महिला साठी अभिमानास्पद असुन
याचा फायदा परिसरातील महिलानी घ्यायला हवा.
आजच्या स्थितीला महिला सर्वच क्षेत्रांत दैदिप्यमान कामगिरी करत असताना साहित्याच्या क्षेत्रातही
त्यांचे योगदान मोठे आहे.हे नाकारता येत नाही.
परंतु आजच्या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना
स्त्री म्हणून डावलले जात असताना अहमदपूर
सारख्या ग्रामीण भागात हे संमेलन पार पडत असुन त्याला सर्व ठिकाणाहून चांगला प्रतिसाद मिळत आहे म्हणुन संमेलन निश्चितपणे यशस्वी
होईल असा आशावाद त्यांनी संमेलनाच्या
संयोजन समितीच्या वतीने व्यक्त केला.
संमेलनाचे अध्यक्षपद बीड येथील प्रसिद्ध लेखिका,माजी आमदार कांम्रेड उषाताई दराडे
या भुषवणार असुन ऊद्घघाटक म्हणून जळगाव येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व नामवंत लेखिका प्रतिभाताई शिंदे या उपस्थित राहणार
आहेत.तर साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष
पदी अँड ज्योती काळे या आहेत.
समेंलानात पहिल्या दिवशी २० जानेवारी ला सकाळी ग्रंथदिंडी , ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन व त्या नंतर मराठी कादंबरी आणि मराठवाड्यातील
स्त्री कांदबरी लेखन या विषयावर परिसंवाद होणार आहे.त्यानंतर दुपारी कथाकथनाचे आयोजन केले आहे.तर दुसऱ्या दिवशी २१ जानेवारीला विद्यमान
तंत्रज्ञान आणि माध्यमातील स्त्री प्रतिमा या विषयावर परिसंवाद होणार आहे.दुपार नंतर संमेलनाचा समारोप होणार असुन या लेखिका साहित्य संमेलनाचा आस्वाद मराठवाड्यातील साहित्य रसीकानी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले..!!