प्रा.सारिका बकवाड यांना महाराष्ट्र भूषण व जीवन गौरव पुरस्कार जाहीर.

 

महात्मा कबीर समता परिषद यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, रेखीव व्यक्तींना हा मानाचा सन्मान त्यांच्या कार्याचा उचित सन्मान म्हणून दिला जातो.
शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात कर्तव्य बजावत व समाजाप्रती प्रबोधनात्मक कार्य करण्याच्या प्रेरणेनेतून प्रा.सारिका बकवाड यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.
प्रा.सारिका बकवाड हे अध्यापना बरोबरच साहित्य,लेखन,आणि सामाजिक चळवळीत सक्रिय असतात..विविध मान्यवरांच्या
हस्ते 28 जानेवारी रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा रंगणार आहे, अशी माहिती महात्मा कबीर समता परिषदे कडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *