कंधार : येथून जवळच असलेल्या फुलवळमध्ये सौ जयश्री आईनाथराव डांगे यांनी रविवार दि 28 जाने 24 रोजी आम्ही वर्गमित्र बँच 1992 – 93 या व्हाट्सएप ग्रुपच्या सर्व सदस्यांसाठी त्यांच्या राहत्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी स्वतंत्र कविता संग्रह प्रकाशित केल्याबद्दल प्रा भगवान आमलापुरे यांचा शाल, पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी आईनाथराव डांगे, विजयकुमार सादलापुरे आणि आनंदराव पळसकर छायाचित्रात दिसत आहेत.
यावेळी संजय भोसीकर, नायब तहसीलदार, तहसील कार्यालय लोहा ; दत्ता कंधारे, कैलासराव फुलवळे,पांडुरंग शेळगावे,परमेश्वर स्वामी, सुरेश बनसोडे आणि ज्ञानेश्वर पोतदार उपस्थित होते. फोटो क्लिक : कु नेहा भोसीकर