कंधार : प्रतिनिधी
अमळनेर येथे होणाऱ्या दि.२ ते ४ फेब्रुवारी रीजी होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात अनिता दाणे-जुंबाड यांच्या कवितेची निवड झाली आहे. गेली चोवीस वर्षे अनेक साहित्य प्रकारात त्यांचे लेखन प्रकाशित झालेले आहे.अनेक सामाजिक ज्वलंत विषयावर परखड भाष्य व त्या संदर्भातील जाणीव लीलया पेलणारी त्यांची लेखनी कवितांच्या प्रांतातही तितक्याच ताकदीने वावरते.
साहित्य क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.