हरणाची शिकार करणाऱ्या टोळीचे दोघेजण ताब्यात

 हिमायतनगर; 


 तालुक्यात हरणाची शिकार करणारी टोळी सक्रिय झाली असून, वडगाव तांडा शिवारातुन दोन हरणाची हत्या करून मांस घेऊन पलायन करणाऱ्या तिघांना रात्र गस्त घालणार्या तरूणांनी पकडुले आहे, या घटनेने वन्य प्राण्यांची शिकार करणार्या शिकार्यामध्ये खळबळ उडाली आहे. या आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, सदर घटनेचा पंचनामा वनपरिक्षेञ अधिकारी संध्याताई डोके,प शुवैधकीय अधिकारी आणि  वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी केला आहे. 

 हरणाची शिकार करून मास घेवून जाणाऱ्या तिघांना युवकांनी पकडुन दिल्यानं हा प्रकार उघडकीस आला .आता या टोळीचा पर्दाफाश करण्यात वनविभाग किती तत्परता दाखवते याकडे वन्यप्रेमी नागरिकांसह तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *