प्रतिनिधी, कंधार
अरुणाचल प्रदेशमध्ये
जीआरईएफचे वाहन खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात मौजे आंबुलगा (ता. कंधार) येथील एका जवानाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी, ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.२५ वाजताच्या सुमारास घडली. महेंद्र बालाजी आंबुलगेकर (वय ३६) असे मृत जवानाचे नाव आहे.
तालुक्यातील मौजे आंबुलगा येथील महेंद्र बालाजी आंबुलगेकर हे अरुणाचल
प्रदेशमधील जीआरईएफमध्ये कार्यरत होते. कर्तव्यावर असताना बुधवारी, ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.२५ वाजताच्या सुमारास
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे
जीआरईएफचे वाहन खोल दरीत कोसळले. या अपघातात महेंद्र आंबुलगेकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. महेंद्र आंबुलगेकर यांचे पार्थिव शनिवारी, ३ फेब्रुवारी रोजी अरुणाचल प्रदेश येथून विशेष विमानाने रात्री हैदराबाद येथे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर आज रविवारी, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता मूळगावी मौजे आंबुलगा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.