नांदेड – मुलगी नको आणि मुलगाच हवा ही मानसिकता असणाऱ्या समाजात आता परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. अडाणी, अशिक्षित लोकांमध्येही मुलीच्या जन्माचे स्वागत मोठ्या उत्साहात होऊ लागले आहे. येथील प्रसिद्ध व्यापारी शंकर वाघमारे आणि अनिता वाघमारे यांची नात व कोमल वाघमारे आणि सतीश वाघमारे ( बाळू भाऊ ) यांच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीचे स्वागत शहरातील वामननगर, दीपनगर परिसरातील भाजी मंडईत फटाके फोडून आणि जिलेबी वाटप करुन मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रज्ञाधर ढवळे, सटवाजी माचनवार, अनुरत्न वाघमारे, गंगाधर कुरुळेकर आदींची उपस्थिती होती.
मुलगी झाली हो….! म्हणून अगदी आनंदाने वाघमारे कुटुंबातील सदस्यांनी फटाके फोडून आणि जिलेबी वाटप करुन मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा केला. सर्व व्यापारी आणि भाजी विक्रेत्यांना मिठाई वाटप केली. आपण मुलीच्या जन्माचे स्वागत मोठ्या आनंदाने केले पाहिजे हा संदेश दिला. वाघमारे कुटुंबियांसह सुनंदा वाघमारे, संगीता रमेश दुंडे, सविता कचरु बनसोडे, विशाल वाघमारे, संग्राम वाघमारे, रवी, अंजली, राणी, स्वाती, मैत्रा दीदी, लक्ष्मण राक्षसमारे, संदिप गायकवाड, विठ्ठलराव रासे, रब्बानी सेठ, भुजंग कांबळे, शब्बीर मामू, दामोदर वाघमारे, किसन बेलाजी कनाळे आदींनी या प्रसंगी घरी आलेल्या मुलीचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.