कंधार : कंधार तालुक्यातील मौजे पेठवडज येथील मंजूर मातोश्री पाणंद रस्ते मधुन मंजूर झाला असुन त्यास तांत्रिकमान्यता क्रमांक 13 दि. 06/04/2023 व प्र.मा.क्र.11 दि. 08/05/2023 त त्यास पंचायत समिती कंधार कडून काम करण्याची परवानगी दिल्यानंतर सदर पाणंद रस्त्याच्या कामाचे करण्यात आले होते. यास काही शेतकरी जाणूनबुजून अडथळा आणत आहेत. विशेष बाब म्हणजे या शेतकऱ्यांच्या त्या जमिनीचा सातबारा नसून ती जमीन तलावात अधिगृहित केली आहे.
त्यांचा कुठलाही सबंध नसताना ते जाणून बुजून शेतक-र्याना अडचणीत आणत आहेत. सदर रस्ता हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न व प्रगतीला अडथळा होत आहे. सदर रस्त्याच्या बाजूचे अतिक्रमण काढण्यासाठी मदत करून सहकार्य करावे व शेतकऱ्यांच्या प्रगतीचा रस्ता मोकळा करून द्यावा या संदर्भात वारंवार निवेदने दिली तरी देखील या संदर्भात कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे रस्त्याचे काम अद्याप झाले नाही. शासकीय लालफितशाहीच्या धोरणामुळे शासनाच्याग’शेत तिथे पांदण रस्ता’ या योजनेचा पार फज्जा उडाला आहे.
गत अनेक वर्षांपासून पावसाने जुन्या गावाला जोडणारा पांदण रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. अनेकांनी तर यात शेतजमीनीचे रुंदीकरण करुन अतिक्रमण केले याच झालं असं की या भागातील रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी,विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी परिसरातील सरपटणाऱ्या प्राण्यांचा सामना करावा लागत आहे तसेच शेतात निघालेले उत्पादन बाजारात न्यायचे कसे, असा फार मोठा यक्षप्रश्न समोर उभा आहे. पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील पांदण रस्ते चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी त्रास सोसावा लागतो. शेतक-र्यांना जीवन, मरणाच्या यातना सहन करत त्या रस्त्याने ये जा करावे लागत आहे.
सदर रस्त्याचे काम अतिक्रमण मुक्त करून मातोश्री पांदण रस्त्याचे काम पेठवडज पुनर्वसन परिसराला जोडणारा २ किलोमीटरचा मातोश्री पांदण मार्ग गेल्या काही वर्षापासून दुर्लक्षित झाला आहे. हा रस्ता मोकळा करुन न्याय देण्या संदर्भात सरपंच प्रतिनिधी नारायण गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांनी कंधार तहसिलदार यांच्या दालनात जाब विचारत उपोषणास प्रारंभ करताच दोन तासानंतर सदर उपोषणा संदर्भात लेखी पत्र देऊन दि.२३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करण्याचं आश्वासन घेऊन सदर उपोषण स्थगित करण्यात आले.
मात्र गत अनेक वर्षांपासून पावसाने जुन्या गावाला जोडणारा पांदण रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. अनेकांनी तर यात शेतजमीनीचे रुंदीकरण करुन अतिक्रमण केले याच झालं असं की या भागातील रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी,विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी परिसरातील सरपटणाऱ्या प्राण्यांचा सामना करावा लागत आहे तसेच शेतात निघालेले उत्पादन बाजारात न्यायचे कसे, असा फार मोठा यक्षप्रश्न समोर उभा आहे. पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील पांदण रस्ते चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी त्रास सोसावा लागतो. यासाठी मातोश्री पांदण रस्त्याच्या खडीकरणाची मागणी वारंवार होत आहे यातच अतिक्रमण धारक शेतकरी व नागरिक मात्र यास विरोध करीत आहेत त्यासाठी पण शासनाच्या उदासीन धोरणामुळे पांदण रस्त्याचा आराखडा तयार झाल्यानंतर पांदण रस्त्यांच्या विकासासाठी कार्यक्रम आखल्या गेला नसल्याने पांदण रस्त्याची दशा पालटू शकली नाही.
कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी वडिलोपार्जित शेती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शेतकरी करतात. तालुक्यातील तसेच गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते उपलब्ध आहेत. परंतू या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी देखील या पांदण रस्त्यांची समस्या निकाली निघू नये, ही खरी शोकांतिका आहे.