खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची नैसर्गिक आपत्तीत अनेकांना मदत रुपी सेवा

 

 

आपल्या भारतीय संस्कृतीने परोपकार हे पुण्य तर परपीडा ही पाप मानले आहे. परोपकाराचा अर्थ सेवा आहे निरमोही मनाने,निर्मळ अंतकरणाने अनाथाचा नाथ व्हावे भुकेल्या व्यक्तीला भाकर द्यावी पंगो व्यक्तीला आधार द्यावा तर आडल्या नडलेल्याच्या कामाला कुठलाही स्वार्थ न ठेवता उपयोगी पडावे या सर्वच गोष्टींमध्ये सेवा आहे आपण प्रामाणिकपणे जर कोणतीही सेवा केली तर निसर्ग आपल्याला सुख प्रदान करत असतो म्हणजे आपल्या व्यक्तिमत्व विकास करण्याचे पैलू निर्माण करतो या देशाच्या प्राचीन भूमीमध्ये विकासाचे नांदेड जिल्ह्याचे महामेरू असलेल्या आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी अनेकांना सुख-दुःखाच्या प्रसंगी मदत करून त्यांची सेवा करून सेवेचा आदर्श घालून दिला आहे प्राचीन भारताचा इतिहास जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा त्या कालखंडात अनेक ऋषीमुनींनी ज्ञानदानाच्या माध्यमातून या देशाच्या भावी पिढीला घडवून एक प्रकारची ज्ञान सेवा केली आहे आपण लोकांची सेवा करावी याकरिता एका कवींनी सुंदर लिहिले आहे “सूर्यकुलाशी नाते ज्यांचे त्यांनी थोडा उजेड द्यावा युगायुगांचा अंधार जिथे पहाटेचा गाव न्यावा ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे” या सर्वच गोष्टींमध्ये सेवेचा अर्थ लपलेला आहे.

 

निष्काम भावनेने केलेले कार्य म्हणजे सेवा. संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञान तपश्चर्याने समस्त मानवांना अमृत करून उपदेश केला आणि धुरीतांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेवांशील तो तेला हो प्राणी जात या भावनेत सेवाभाव व्यक्त झाला आहे नंतरच्या कालखंडात अनेक पंडित कवींनी शाहिरांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून सेवेचा खरा अर्थ सांगितला कर माय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला विसरू नको रे भल्या माणसा तुझ्या तो आई बापाला हा खरा सेवेचा भाव आहे
झाडे ऊन वादळ पाऊस वारा यांचा मारा सहन करून थंडसावली गोड फळे देतात चंदन स्वतः झिजून इतरांना सुगंध देत नद्या स्वतः वाहून इतरांची तहान भागवतात धरती सुजलाम सुफलाम करतात ही सर्व निसर्गातील उदाहरणे आपणास सेवाभाव सांगत असतात स्वर्गीय बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली.मदर तेरेसा यांनीही इतरांना मदतीचा हात दिला राष्ट्रसंत गाडगेबाबा राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांनी सदैव सेवाभाव जागा केला राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांनी गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. तर सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांची माय होत निराधार लेकरांना आधार दिला मायेचे वाचले आणि प्रेम दिले सेवा ही परोपकाराच दुसरे नाव आहे म्हणून आपण इतरांच्या मदतीला धावून जावं इतरांची मदत करावी ज्ञानी माणसाने अज्ञान संपविणे म्हणजे सेवा श्रीमंत माणसाने एकदाच दारिद्र्य संपविणे म्हणजे सेवा एखाद्या सर्वोत्कृष्ट कीर्तनकाराने निर्मळ अंतःकरणाने प्रबोधन करून अनेकांचे जीवनामध्ये ज्ञानप्रकाश पसरविणे म्हणजे सेवा. सेवेचे अनेक अर्थ आहेत आजही समाजात सेवा करणारी माणसं निश्चितच कार्यरत आहेत म्हणूनच म्हटले गेले आहे सर्विस तो मॅनेज सर्विस टू गॉड अर्थात मानवाची सेवा हीच ईश्वराची सेवा.

आज समाजात सेवाभावाला कमी नाही हजारो लोक विविध मार्गाने सेवा करत आहे कोणी मोठमोठी दवाखाने उभा करून गोरगरीब लोकांसाठी मोफत उपचार करतात कोणी अन्नछत्राच्या माध्यमातून भुकेल्या लोकांची भूक भागवतात कोणी उन्हाळ्यात पाणपोया लावून तहान भागवतात कोणी मानवी जीवनातील दुःख दूर करत करत खराी सेवा निभावत असतात सेवा करणे म्हणजे आपल्या अंतकरणाला समाधान प्राप्त करून घेणे होय महात्मा गांधी म्हणतात सेवेतच देव आहे सेवा हाच भाव आहे आणि म्हणून जो कोणी व्यक्ती निर्मळ मनाने इतरांची सेवा करतो त्याच व्यक्तीत परमेश्वर वास करत असतो ते नाव आहे आदरणीय खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांचे आपल्या मतदारसंघातीलच नाहीतर संपूर्ण नांदेड जिल्हा व त्या बाहेरील ज्या कुण्या व्यक्तीला शेतात काम करताना विंचू साप चावला त्यांना चटकन मदत मिळून दिली कोणी बीज पडून अपघाती मृत्यू पावले अशा सर्वांना आदरणीय साहेबांनी मदत केली आणि जनसेवेचा वसा घालवून दिला.

 

 

 

*सुनिल रामदासी*
पत्रकार
9423136441

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *