मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार.

 

कंधार (ॲड सिध्दार्थ वाघमारे)

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त कंधार तालुका शिवसेनेच्या वतीने कंधार मधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या सत्कार शिवसेना तालुका प्रमुख ॲड.मारोती पंढरे यांच्या वतीने करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी ॲड.मारोती पंढरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आसे म्हणाले की प्रत्येक वाढदिवसाला वेगवेगळे कार्यक्रम घेतोत, रुग्णांना फळे वाटप, मूकबधिर मुलांना फळे व वही वाटप आणि जेवण देणे असे अनेक कार्यक्रम घेतो पण यासोबतच डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्याकडे कधी लक्ष केले नाही म्हणुन आजच्या वाढदिवसाच्या दिवसी ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्या हिंदुरुदयसम्राट यांच्या नावाने हा दवाखाना चालतोय त्याच दवाखान्यातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार करण्याचे करण्यात आले.

यावेळी शिवसेना पदाधिकारी माधव तांबोळी, संदीप मेहकरकर, अच्युत मेटकर, सचिन श्रीगणवाड, शेख साहेब, मारोती वाघमारे, माधव जाधव व शिवसैनिक उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *