खासदार चिखलीकर साहेब याचे राजकीय पाऊल उत्तम यशाकडे… सुनिल रामदासी

 

 

चुका देखील होतील आणि चुकीचे देखील समजले जाईल. हे जीवन आहे मित्रानो, इथे स्तुती देखील होईल आणि नाव पण ठेवले जाईल. परंतु आपल्याला स्वतःचा अभिमान असायला हवा की आपण इतक्या दूर पर्यंत आलो आहोत, आणि आपल्याला स्वतःवर विश्वास असायला हवा की आपण आणखी दूरवर जाऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मध्ये एक विजेता शोधायला हवा. डोळे आपल्याला केवळ दृष्टी देत असतात परंतु आपण कधी कशात काय बघायचे? हे आपल्या विचारांवर आधारित आहे. त्यामुळे आपले विचार हे उच्च ठेवा. कोणीतरी म्हणून गेले आहे की, राजकारणात व जीवनात समस्या हे तर दररोज नविन उभे राहतात परंतु जिंकतात तेच ज्यांचे विचार मोठे असतात आसे व्यक्तीमत्व नांदेड जिल्ह्याचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब याचा राजकीय जिवनपट उत्तम यशाच्या दिशेने चालूच आहे.

राजकारणात कोणीही आपल्या नशिबाला दोष देत बसू नका, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, जिथे प्रयत्नांची पराकाष्टा केली जाते तिथे नशिबाला देखील झुकावे लागते. यश प्राप्ती साठी आपले जिद्द आणि कष्ट देखील असले पाहिजेत कारण विचार तर प्रत्येक व्यक्ती करू शकतो. मेहनत करण्याचा दम असायला पाहिजे कारण मोठमोठ्या बाता तर कोणीही मारत असतो. वेडेपणा हवा असतो मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, छोटे विचार तर प्रत्येकजण ठेवत असतो. प्रेम असायला पाहिजे आपल्या स्वप्नांशी आणि आपल्या यशाशी, मनुष्यावर प्रेम तर कोणीही करत असतो. पण मनुष्याच्या गरजा व आडचणी समजावून घेऊन त्याची सोडवणूक करण्याची जी धमक पाहिजे तिच खासदार चिखलीकर साहेब यांच्या व्यक्तीमत्वामध्ये दिसून येते.

या राजकारणाचे एक कटू सत्य आहे की, एक वेगळीच स्पर्धा व शर्यत आसते हि राजकारणाची स्पर्धा, जिंकाल तर कित्येक आपल्या सोबतीदार किवा कधीकधी परिवारातील लोकांना मागे सोडून जावे लागते आणि पराभूत व्हाल तर कित्येक आपलेच लोक आपल्याला मागे सोडून पण जातील.

खासदार चिखलीकर साहेब यानी आपल्या सर्वच राजकीय.सामाजिक किवा कुठल्याही क्षेत्रात कधीच बढाया मारल्या नाहीत. “कारण वेळ तर त्या नोटांची देखील गेली ज्या एक वेळी पूर्ण बाजारपेठ खरेदी करू शकत होत्या.” जेव्हा आपण गप्प बसून सर्व काही ऐकून घेत असतो तोपर्यंत आपण या जगाला खूप चांगले वाटत असतो. कधीतरी आपण जेव्हा खरी गोष्ट बोलून जातो तेव्हा सर्वाच्या नजरेत आपण वाईट होऊन जातो. जीवनात काही करायचे असेल तर लोकांना न ऐकल्या सारखे करायला शिका, कारण लोक तुमची निंदा तोपर्यंत करत राहतील जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाहीत. आपले निर्णय स्वतः घ्यायला शिका, कारण जो मनुष्य जीवनाचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही तो जीवनात आणखी काय करू शकेल?

खासदार चिखलीकर साहेब यानी राजकारणातील स्वतःच्या आतील भीती अगोदर संपवून टाकाली. प्रॉब्लेम्स हे आपल्या जीवनात उगाचच येत नाहीत, तर त्यांचे येणे हे एक इशारा आहे की, आपल्याला आपल्या जीवनात काहीतरी बदलायला हवे आहे. मोठे स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सफलता आणि असफलता यांच्या अनेक पायऱ्यांवरून जावे लागते.

2019 ला नांदेड लोकसभा निवडणूकीत लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने काही विरोधक लोकानी चेष्टा केली तर निवडून आल्यानंतर तेच चेष्टा करणारे लोक सोबत आले.आणि नंतर विरोध करणारे लोक पुढे म्हणू लागले की आम्हाला माहीत होतं की एक ना एक दिवस तूम्ही काही तरी मोठं करणार आहेत.

*”विचारांना ताब्यात ठेवा, ते तुमचे शब्द बनतील”*
*”शब्दांना ताब्यात ठेवा, ते तुमचे कर्म बनतील”*
*”कर्माला ताब्यात ठेवा, ती तुमची सवय बनेल”*
*”सवयीला ताब्यात ठेवा, ते तुमचे चरित्र बनेल”*
*”चरित्र ताब्यात ठेवा, ते तुमचे भाग्य बनेल”*

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचे राजकीय एक पाऊल नेहमीच यशाकडे आहे.ते ही आपल्या विचारांना ताब्यात ठेवून. सर्वात मोठा यशाचा मंत्र आहे, विचार व सयंम त्याच्या ताब्यात आहे अश्या या कर्तबगार नेतृत्वाला *2024 ला नांदेड लोकसभा क्षेत्रातुन आपल्या सर्वाच्या आर्शीरवादाने पुन्हा एकदा एक दमदार खासदार म्हणून विजयी करण्याची जवाबदारी आपली आहे…*

 

*सुनिल रामदासी*
पत्रकार
9523136441

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *