मजबूती का नाम महात्मा गांधी हे पुस्तक भेट

अहमदपूर : गांधीजी आणि गैरसमज 2024 ( फाळणी असो की भगतसिंगांची फाशी, अनेक बाबतीत गांधीजींना ठरवून बदनाम केले जाते. काय आहे त्यामागील सत्य ? ते पुराव्यानिशी उलगडणारी अभिनव दिनदर्शिका ) या दिनदर्शिकेचे आणि मजबूती का नाम महात्मा गांधी या ग्रंथाचे लेखक चंद्रकांत झटाले, अकोला ; दि 01 फेब्रु 24 रोजी अहमदपूर येथे आले होते. त्यांनी येथील महात्मा गांधी महाविद्यालया समोरील महात्मा गांधी नगरात, गांधी अभ्यासक भागवत येनगे यांच्या निवासस्थानी भेट दिली.

जवळपास दिड तास त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. शिवाय त्यांनी भागवत येनगे यांना एक दिनदर्शिका आणि मजबूती का नाम महात्मा गांधी हे पुस्तक भेट दिले. त्यावेळी ,पुसापचे अध्यक्ष एन डी राठोड ,जेष्ठ विचारवंत – कवी सुनील खंडाळीकर आणि प्रा भगवान आमलापुरे उपस्थित होते.

छायाचित्र : हरिदास तम्मेवार ( मसाप कार्यवाह, शाखा अहमदपूर )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *