अहमदपूर ( प्रतिनिधी ) दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये संत सेवालाल महाराज यांची 285 वी
जयंती मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी शैलेश जोशी आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी राजकुमार सोनकांबळे यांच्या शुभहस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या जयंती महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय गोर बंजारा साहित्य संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री गोपाळ चव्हाण, भारतीय बंजारा समाज परिवर्तन अभियानाचे जिल्हाध्यक्ष नाथराव राठोड,
अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संघाचे राज्य अध्यक्ष श्री एन डी राठोड, काळेगावचे जहागीरदार शुकूरमियाँ पटेल, पंचायत समितीचे यशवंत देशमुख, सौ मनीषा मिरजकर, वर्षा भगत, रेणुका खंदाडे टी पी नरवटे ,एस पी आबंदे, व्ही एम केंद्रे , एस आर कांबळे ,एस जे हिवरे, डी आय शेख, एस बी तोडसाम, मिलिंद कवळे, विस्तार अधिकारी रमाकांत पट्टेवाड, बोधिसत्व फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री आर जी कांबळे, विस्तार अधिकारी कृषी श्री हनुमंतराव मुरुडकर, माजी विस्तार अधिकारी ,शिक्षण ; रामराव राठोड आणि माजी आमदार रामभाऊ गुंडले यांचे बंधू कोंडीबा गुंडीले उपस्थित होते. या सर्व प्रमुख पाहुण्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी श्री शैलेश जोशी यांनी संत सेवालाल महाराज यांच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी पंचायत श्री रमाकांत पट्टेवाड यांनी केले तर श्री नाथराव राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.