संजय गांधी निराधार योजनेच्या कंधार तालुका अध्यक्षपदी बाबुराव किडे यांची नियुक्ती

 

 

कंधार; प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शिफारशीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अध्यक्षपदी बाबुराव किडे तर सदस्य पदी हौसाजी वाघमारे, श्रीमती जनाबाई घुगे, अवधूत पेटकर, शेख हुसेन पाषामिया, महेश पिनाटे, श्रीमती शोभाताई कपाळे, विठ्ठल कतरे यांची कंधार तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्ष व सदस्य पदी नुकतीच नियुक्ती झाल्याचे पत्र नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहे,

संजय गांधी निराधार योजना समितीच्या नवनियुक्त अध्यक्ष व सदस्यांची लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे , शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे ,लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा मराठवाडा सहचिटणीस विक्रांत दादा शामसुंदर शिंदे, शेकापचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे, शेकापाचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसातकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *