नांदेड :
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संकल्पनेतून विश्वविख्यात अध्यात्मिक प्रवचनकार जया किशोरी यांच्या आमृतवाणीतून 25 व 26 फेब्रुवारी रोजी श्रीराम आणि श्रीकृष्ण कथा या भव्य दोन दिवशीय सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रदेश महिला भाजपाच्या उपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नांदेड लोकसभा मतदारसंघात अनेक महत्त्वपूर्ण विकासात्मक उपक्रम राबविले जात असतानाच नांदेड जिल्ह्यातील जनतेच्या आध्यात्मिक विकासासाठी आणि धर्मरक्षणासाठीही खा. प्रतापराव चिखलीकर यांचा सातत्याने पुढाकार राहिला आहे. धावपळीच्या दुनियेत आध्यात्म अत्यंत महत्त्वपूर्ण असून भक्तिमार्ग हा मानवी सुखाचा आणि समृद्धीचा मार्ग असल्याने आध्यात्माशिवाय वैचारिक समृद्धी शक्य नसल्याने नांदेड लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेसाठी खा. चिखलीकर यांच्या पुढाकारातून दिनांक 25 फेब्रुवारी आणि 26 फेब्रुवारी रोजी हिंगोली गेट परिसरातील गुरुद्वारा मैदान येथे सायंकाळी 5.30 वाजता विश्वविख्यात आध्यात्मिक प्रवचनकार जया किशोरी यांच्या अमृतवाणीतून श्री कृष्ण आणि श्रीराम कथा हा भव्य सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यासाठी भाविकभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व सौ.प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी केले आहे.
जया किशोरीजी यांचा परिचय जया किशोरी या विश्वविख्यात भागवताचार्या असून त्यांचा जन्म 13 जुलै 1995 रोजी राजस्थानमधील एका आध्यात्मिक परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नांव शिवशंकर शर्मा असून त्यांच्या आईचे नाव सोनिया शर्मा आहे. त्यांना एक लहान बहिण चेतना शर्माही आहे. जया किशोरी यांचा संपूर्ण परिवार सध्या कोलकत्ता येथे स्थाईक आहे.जया किशोरी या अवघ्या सात वर्षांच्या असताना त्यांची नाळ आध्यात्मिक जीवनाशी जोडली गेली.बालपणी त्यांच्या आजोबांकडून त्यांना श्रीकृष्ण कथा ऐकावयास मिळाल्याने त्या या कथांवर प्रभावीत झाल्या. अवघ्या नऊ वर्षांच्या असताना त्यांनी संस्कृतमध्ये लिंगाष्टकम्, शिवतांडव स्तोत्र मुखपाठ करून आपल्या मधूरवाणीतून गायनास सुरुवात केली.
प्रारंभी त्यांचे गुरु गोविंदराम मिश्र यांनी बालक असलेल्या जया शर्मा यांना ‘किशोरी’ ही उपाधी दिली. तेव्हापासूनच जया किशोरी असे नामकरण जगप्रसिद्ध झाले. आतापर्यंत त्या अविवाहित आहेत. त्या लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे अनेक वेळा त्यांनी स्पष्ट केले.कथा प्रवचनातून प्राप्त झालेल्या प्राप्तीतून जया किशोरी या गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलून अनाथ गरीब बालकांचे कल्याण केले.