पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या दोन सखी.. दोघींच्याही मेनोपॉजच्या काहीबाही कुरबुरी.. शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि त्यानुसार मानसिक आरोग्यात आलेली मरगळ , वाढत असलेलं वजन, त्यानुसार आलेला चिडचिडेपणा असेल किवा मी जाड झाल्याने मला हे कपडे सुट होत नाहीत म्हणुन आलेलं नैराश्य असेल , आता माझ्याकडे कोणी पाहील का हा मनात सतत घोंघावत असलेला प्रश्न पण हे प्रश्न यातील एकाच सखीला पडत आहेत
आणि दुसरीला ??.. तीही त्याच वयाची आहे ना.. तिलाही मेनोपॉजल बदल आहेतच की , पण तिच्या सकारात्मक स्वभावामुळे ती प्रत्येक क्षणाचा आनंद घेते म्हणजे नक्की काय केलं तिने ??…
जिला नवरा आहे तिने नवऱ्यासोबत हे दिवस साजरे केले…जिला मित्र आहे तिने मित्रासोबत हे डे सेलीब्रेट केले..
जिला बॉयफ्रेंड आहे ती त्याच्यासोबत डेटवर गेली म्हणजे काय केलं तर वय , मेनोपॉज विसरुन तीने रोज व्यायाम केला.. ताजा आहार घेतला.. संध्याकाळी रोज नवनवीन प्लेसला जाऊन निसर्गाचा आनंद घेतला. कॉफी आणि गप्पा . फोटो काढले .. रील्स केले त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही आनंदी आणि निरोगी राहिलं.. दरमहा येणारी तिची सखी सुद्धा तिच्यासोबत मज्जा घेत राहिली त्यामुळे मेनोपॉज चा ती आनंद घेत राहिली.. Nothing is permanent .. आपल्यालाही एक दिवस हे जग सोडायचे आहे तसेच ती सखीलाही आपल्याला सोडुन एक दिवस जायचे आहे.. मग आपल्यासोबत तिलाही हा आनंद द्यायला विसरु नका.. तिची कृतज्ञता व्यक्त करायला कधीही विसरु नका. आपण म्हातारे होत नसतो तर आपलं वागणं बोलणं आपल्याला म्हातारं करतं..
व्हॅलेन्टाइन वीकच का हवा ??.. जर मनाने , शरीराने मी तंदुरुस्त रहाणार असेल तर ३६५ दिवस आनंद घेवू आणि देवु.. भरपुर पैसा आहे आणि फ्रेंड्स नाहीत किवा माणसे नाहीत म्हणुन घरात रडत बसण्यापेक्षा पुस्तकाना जवळ करा .. उत्तम ऐका.. शास्त्राचा अभ्यास करा आणि भरपुर माणसे जोडा.. आपण रोज एखाद्या व्यक्तीला भेटलो तरीही ती व्यक्ती कंटाळणार नाही असं आपलं वागणं बोलणं असायला हवं.. लोकांनी आपल्यावर भरपुर प्रेम करायला हवं असेल तर आपले विचार आणि आपलं कर्तृत्व खुप महान असायला हवं..
दुसऱ्याला बदलवण्यापेक्षा स्वतःमधे बदल करा आणि आज व्हॅलेन्टाइन डे आहे तो आपल्या प्रिय व्यक्तीसोबत साजरा करायला विसरु नका.. माझा आणि सचिनचाही प्लॅन आहे.. दोघे मिळुन लछा पराठा छोले करणार आहोत.. निरोगी राहायचे असेल आणि घर निरोगी हवे असेल तर नवरा बायको मित्र व्हा .. आणि रोजच व्हॅलेन्टाइन डे साजरा करा..
ज्या सखी मेनोपॉजच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत त्यांनी व्यायाम करा , घरचं ताजं अन्न घ्या , आणि काम करत सकारात्मक रहा.. चांगल्या लोकांना भेटा.. नवनवीन गोष्टी जाणून घ्या.. अभ्यास करा.. आपलं साहित्य इतकं महान आहे की अनेक जन्म कमी पडतील.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यसनांपासुन दुर रहा..फालतु गोष्टीना स्टेटस म्हणुन कुरवाळत बसु नका.. अशा मित्र मैत्रीणींपासुन चार हात दूरच रहा..
हरे कृष्ण..
सोनल गोडबोले