मार्गदर्शक २६ जानेवारी २००३ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या संकल्पनेतून श्री गुरु नानकदेव महाराज गुरुव्दारा श्री संत नामदेव महाराज मंदिर आणि श्री कालप्रियनाथ केशवेश्वर लिंग मंदिर शांतीघाट क्रांतिभुवन बहाद्दरपुऱा या भविष्यात होवू घातलेल्या मानवतेच्या तीर्थक्षेत्राची थर्माकोल मधिल प्रतिकृतीचे जागतिक गुराखी साहित्य संमेलन गुराखीगडीवर भरविले असता.माझी तेवढीशी ओळख नसतांना त्या प्रदर्शन हाॅलमध्ये मला सहकार्य करुन आधार देणारे गर्भश्रीमंत स्वभावाचे व्यक्तीमत्व, श्री शिवाजी काॅलेज शिवाजीनगर कंधारचे आदर्श प्रोफेसर आदरणीय प्रा.डाॅ. उत्तमरावजी धुमाळ सरजी यांना सेवापूर्तीस उत्तमोत्तम सदिच्छा व मानाची जयक्रांति!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार