कंधार शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा/स्मारक नियोजीत जागेचे लोकार्पण सोहळा पुढे ढकलला- मारोती मामा गायकवाड यांची माहिती

दि, २९-०२-२०२४ रोजी वार गुरुवार रोजी कंधार शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा/स्मारक नियोजीत जागेचे लोकार्पण सोहळाया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,काही कारणा वास्तव या कार्यक्रमाची तारीख थोडी पुढे घेण्यात आला आहे, अशी माहिती मारोती मामा गायकवाड यांनी दिली.

भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री..आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांचे नांदेड जिल्ह्यातील आगमन..
माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचे पक्ष निरीक्षक मा. सुभाषबापु देशमुख साहेब, व मा. जयकुमार रावल साहेब,
नांदेड विसावा गार्डन येथील
पक्षश्रेष्ठींकडून पक्ष तिकीट वाटपाचे बैठकीचे आयोजन असल्याने..
नांदेड जिल्हाचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार सन्माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब, यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहु शकले नाहीत..
सन्माननीय खासदार साहेबांनी फोन व्दारे कळवले आहे..
आपलं दैवत अण्णा भाऊ साठे यांचे नातू समाजाचे प्रेरणास्थान आदरणीय सचिन भाऊ साठे यांची आर्टी च्या संदर्भात बैठकीचे आयोजन असल्याने अचानक मुंबईला दौरा निघाल्याने या कार्यक्रमाला येणं शक्य नाही,असे फोन व्दारे कळवले आहे,
आणि लातुर लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुधाकरजी शृंगारे साहेब यांनी पण आम्हाला फोन व्दारे कळवले आहे,पक्ष निरीक्षक यांच्या बैठकीचे आयोजन असल्याने या कार्यक्रमाला येणं शक्य नाही,
म्हणून या कार्यक्रमाची तारीख थोडी पुढे घ्यावी..
खासदार साहेबानी व सचिन भाऊ साठे यांनी सकल मातंग समाज बांधवांना ही नम्र विनंती केली आहे.

आयोजक :- सकल मातंग समाज कंधार तालुक्याच्या वतीने आम्ही आव्हान केले आहे..
हा कार्यक्रम निश्चितच पुढे घेतला जाईलं..
आणि लवकरच तारीख कळविल्या जाईलं..

जय शिवराय, जय लहुजी, जय भीम, जय अण्णा,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *