नांदेड : प्रतिनिधी
कोरोना लसीकरण केंद्रात अखंडित ९०१ दिवस मास्क, सॅनिटायझर,पाण्याची बॉटल व बिस्कीट वाटप केल्यानंतर धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या एचआयव्ही ग्रस्त रुग्णांना वर्षभर दररोज लोकसहभागातून बिस्किट वाटप करण्या-या ” क्षुधाशांती ” या ८६ व्या उपक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी इथे शुक्रवारी भाजपा, लायन्स, विहान व अमरनाथ यात्री संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गणेश जोशी हे होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कदम, लायन्स प्रदेशाध्यक्ष शिवप्रसाद सुराणा, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता डी.एच. अग्रवाल, भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश लोट, प्रा. लक्ष्मी पूदरोड, प्रतिष्ठित समाजसेविका स्नेहलता जायस्वाल, निर्मला अग्रवाल, कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस कामाजी सरोदे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शर्मा, लायन्स सेंट्रल सचिव शिवाजी पाटील, सहसचिव गौरव दंडवते, अभय माहेश्वरी,ईश्वर गावखरे, शिवाजी शिंदे, डॉ. सुरेखा साजने, डॉ.जतीन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करताना विहान चे प्रकल्प संचालक प्रा. ऋषिकेश कोंडेकर यांनी असे सांगितले की,एआरटी विभागात दररोज तिनशे पेशंट येतात.
औषधासाठी महिन्यातून एकदा त्यांना नांदेडला यावेच लागते.दुर्धर रोगग्रस्तांसाठी फुल न फुलाची पाकळी या स्वरूपात दररोज रुग्णांना बिस्कीटे देण्याची विनंती दिलीप ठाकूर यांनी मान्य केल्यामुळे अशा प्रकारची सेवा महाराष्ट्रात फक्त नांदेड येथेच उपलब्ध झाली आहे. दिलीप ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की,दरवर्षी किमान हजार रुपये देणाऱ्या व्यक्तीच्या नावाने चार दिवस बिस्किटे वाटप करण्यात येणार आहेत.शक्य असल्यास दानदात्यांनी आपल्या चार दिवसा पैकी एका दिवशी विष्णुपुरी च्या दवाखान्यात जाऊन आपल्या हाताने बिस्किटे वाटप करावे. सोशल वर्कर मार्फत दररोजच्या बिस्किट वाटपाचे फोटो देणगीदारांना पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुराणा, डॉ. कुलदीप अंकुशे यांनी आपल्या भाषणातून दिलीप ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक केले. सकारात्मक पत्रकारिता हा पुरस्कार गणेश जोशी यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य जोशी असे म्हणाले की, दिलीप ठाकूर सारखी समाजसेवा करणारी व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्रात सापडणार नाही. त्यांचे सेवेचे सातत्य कौतुकास्पद आहे.” क्षुधाशांती ” या उपक्रमासाठी रुपेश वट्टमवार ,स्नेहलता जायसवाल ,खुशबू मुत्तेपवार, चंद्रकांत गंजेवार, सोनाली वारले,अरुणा शिवप्रसाद राठी,भास्कर कोंडा,द्वारकादास अग्रवाल,रवी कडगे,अभिजीत काप्रतवार,वसुबेन जयंतीलाल पटेल वसमत,सचिन शिवलाड,प्रथमेश प्रकाश शिवपुजे,राजीव मिरजकर,संदिप शूध्दोधन मांजरमकर,भगवान खांडरे उमरी, चंद्रकांत तुकाराम कोंडे पांगरा,वसंत दिगंबरराव कल्याणकर यांनी आर्थिक मदत केली आहे. याशिवाय दरवर्षी हजार रुपये देण्यासाठी संमती देणाऱ्या मध्ये ॲड.दिलीप ठाकूर,रेणुका जयप्रकाश सोनी,सिद्राम दाडगे,लक्ष्मी पतंगे,रमेश मुत्तेपवार,शिवाजीराव शिंदे, डॉ. संजय तेलंग उदगीर,प्रा.लक्ष्मी पुरणशेट्टीवार,डॉ. संजय गुज्जलवार,व्यंकटरमन दुगमवार,हरिभाऊ बिडवई पुणे,चंपालाल कोठारी,भानुदास काब्दे,प्रगती बालाजी निलपत्रेवार,वंदना शेळके परभणी, जयश्री श्रीकांत झाडे लातूर,गायत्री भायेकर,ज्योत्स्ना निशिकांत पाटील,
अशोक संभाजीराव दालपे ,
राजेंद्र मनाठकर हदगाव,
सुरेखा पाटील पुणे,गणेश गोडसे मुदखेड,अजय दमकोंडवार धर्माबाद,प्रमोद राऊळवार कौठा,आदेश गट्टानी,महानंदा उदगीरकर,हनुमानसिंग ठाकूर सरपंचनगर,साजिद वींधानी,
सुधीर विष्णूपुरीकर,सुषमा हुरणे,डॉ पंकज लक्ष्मीकांतराव निळेकर,उदय जैन मानवत,सुनील वट्टमवार कौठा,प्रमिला भालके, बिरबल बिरजू यादव,वसंत अहिरे,सुधाकर जबडे देगलूर,श्रीहरी लोनाळकर यांचा समावेश आहे. आरोग्य प्रवृतक दिनेश ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प सम्वयक कल्पना कोकरे, हेल्थ चॅम्पियन गायत्री भायेकर, , कपिल वाघमारे, हणमंत वादुलवाड, शिल्पा वाघमारे, रजनीश दवणे, योगेश बनसोडे यांनी परिश्रम घेतले. वर्षभरात आधीच जगावेगळे ८५ उपक्रम राबवित असताना ८६ वा नवीन उपक्रम सुरू केल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.