नांदेड जिल्ह्यात दि 11 सप्टेंबर रोजी 12 जणाचा कोरोनामुळे मृत्यू ;आज 396 बाधितांची भर

नांदेड ;

शुक्रवार 11 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 261 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 396 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 178 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 218 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 656 अहवालापैकी 1 हजार 183 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 10 हजार 709 एवढी झाली असून यातील 6 हजार 745 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 608 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 55 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

** सर्वाधिक १२ जणांचा मृत्यू

या अहवालात बुधवार 9 सप्टेंबर रोजी हिमायतनगर येथील 37 वर्षाची एक महिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे, गुरुवार 10 सप्टेंबर रोजी हदगाव तालुक्यातील कौठा येथील 65 वर्षाच्या एका महिला, नवीपेठ मुखेड येथील 68 वर्षाचा एक पुरुष, आंबेडकरनगर लोहा येथील 80 वर्षाचा एक पुरुष, मुखेड तालुक्यातील पाला येथील 70 वर्षाचा एक पुरुष, देगलूर तालुक्यातील इब्राहिमपूर येथील 60 वर्षाच्या एका महिलेचाशासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर किनवट येथील 85 वर्षाच्या एका महिलेचा किनवट कोविड रुग्णालयात, नायगाव तालुक्यातील सावरगाव येथील 70 वर्षाची एका महिला, आंबेडकरनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड, शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी कंधार तालुक्यातील मंगलसांगवी येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे, बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, फरांदेनगर नांदेड येथील 81 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालय येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 295 झाली आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 10, मुखेड कोविड केंअर सेंटर 17, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 13, खाजगी रुग्णालयातून 16, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 8, नायगाव कोविड केंअर सेंटर 2, बिलोली कोविड केंअर सेंटर 8, मुदखेड कोविड केंअर सेंटर 2, पंजाब भवन कोविड केंअर सेंटर 94, किनवट कोविड केंअर सेंटर 48, हदगाव कोविड केंअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 15, बारड कोविड केंअर सेंटर 1 असे 261 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 114, भोकर तालुक्यात 1, अर्धापूर तालुक्यात 2, देगलूर तालुक्यात 3, किनवट तालुक्यात 7, लोहा तालुक्यात 1, परभणी 1, लातूर 1, नांदेड ग्रामीण 8, हदगाव तालुक्यात 8, मुखेड तालुक्यात 12, धर्माबाद 1, कंधार तालुक्यात 2, बिलोली तालुक्यात 2, नायगाव तालुक्यात 14, हिंगोली 1 असे एकुण 178 बाधित आढळले.

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 89, बिलोली तालुक्यात 17, अर्धापूर तालुक्यात 9, किनवट तालुक्यात 13, नायगाव तालुक्यात 2, मुखेड तालुक्यात 17, धर्माबाद तालुक्यात 12, भोकर तालुक्यात 3, नांदेड ग्रामीण 18, मुदखेड तालुक्यात 2, लोहा तालुक्यात 15, कंधार तालुक्यात 6, हदगाव तालुक्यात 3, माहूर तालुक्यात 4, उमरी 7 व यवतमाळ 1 असे एकुण 218 बाधित आढळले

जिल्ह्यात 3 हजार 608 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 284, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयसोलेशन एकत्रित 1 हजार 669, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 106, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 146, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 119, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 158, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 55, लोहा कोविड केअर सेंटर येथे 88, हदगाव कोविड केअर सेंटर 72, भोकर कोविड केअर सेंटर 8, कंधार कोविड केअर सेंटर येथे 54, किनवट कोविड केअर सेंटर येथे 171, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 28, मुदखेड कोविड केअर सेटर 58, माहूर कोविड केअर सेंटर येथे 29, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 53, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 56, उमरी कोविड केअर सेंटर 66, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 15, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 354 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 7, निजामाबाद येथे 2 बाधित, मुंबई येथे 1 बाधित तर हैद्राबाद येथे 4 बाधित, लातूर येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *