व्हॉईस ऑफ मीडियाच्या कंधार तालुकाध्यक्ष पदी सय्यद हबिब उपाध्यक्षपदी मारोती चिलपिपरे

 

कंधार : प्रतिनिधी

व्हॉईस ऑफ मीडियाच्या कंधार तालुका अध्यक्षपदी सय्यद हबिब सय्यद इसाक तर उपाध्यक्षपदी मारोती चिलपिपरे यांची निवड करण्यात आली आहे.

व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे कार्य सुरू आहेत. पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया पुढाकार घेत असून नांदेड जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले, महानगर अध्यक्ष डॉ.गणेश जोशी यांनी तालुका कार्यकारणी निवड कार्यक्रम आखला असून नुकतीच माहूर, बिलोली व्हॉईस ऑफ मीडिया तालुका कार्यकारणी निवडल्यानंतर कंधार येथील पत्रकारांची बैठक घेवून कंधारची व्हॉईस ऑफ मीडिया तालुका कार्यकारणी निवडण्यात आली.

यात व्हॉईस ऑफ मीडियाच्या तालुका अध्यक्षपदी सय्यद हबिब सय्यद इसाक, उपाध्यक्षपदी मारोती चिलपिपरे, सचिव पदी विनोद तोरणे, सहसचिव संतोष कांबळे, कार्याध्यक्ष माधव गोटमवाड, सदस्य सिद्धार्थ वाघमारे, मगदूम परदेशी, जमील बेग, अॅड. उमर शेख, माधव जाधव पानशेवडीकर यांच्यासह आदी जणांची कार्यकारणी निवडण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *