नांंदेेड: ( दादाराव आगलावे)… प्राचीन हिंदुस्थानी तत्वज्ञानात मन आणि शरीराचा अभ्यास म्हणून योगाला ओळखले जाते. योगाच्या विविध शैली शारीरिक आसने, श्वासोच्छ्वासाची तंत्रे आणि ध्यान किंवा विश्रांती एकत्र करतात. योग ही मूलत: अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित एक आध्यात्मिक शिस्त आहे, असे प्रतिपादन योग प्रशिक्षक योगाचार्य सितारामजी सोनटक्के गुरुजी यांनी केले. मालेगाव रोडवरील भक्ती लॉन्स येथे योग अभ्यासाचे धडे देताना ते बोलत होते. मागील पाच महिन्यापासून येथे ते योगाचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. या योग शिबिरास नांदेडकरांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. योगाचे धडे देताना योगाचार्य सितारामजी सोनटक्के गुरुजी पुढे म्हणाले की, योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते,
लवचिकता आणि ताकद वाढवते, तणाव आणि चिंता कमी करते, एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते पचन आणि रक्ताभिसरण सुधारते. “योग” हा शब्द स्वतःच एक संपूर्ण विज्ञानासारखा आहे जो शरीर, मन, आत्मा आणि विश्वाला एकत्र आणतो. योगाचा इतिहास सुमारे ५ हजार वर्ष जुना आहे, जो प्राचीन हिंदुस्थानी तत्वज्ञानात मन आणि शरीराचा अभ्यास म्हणून ओळखला जातो. योगाच्या विविध शैली शारीरिक आसने, श्वासोच्छ्वासाची तंत्रे आणि ध्यान किंवा विश्रांती एकत्र करतात.
योगाची आठ अंगे सांगितली आहेत ती म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी होत. यास अष्टांगयोगही म्हटली जाते. योगाचार्य पुढे म्हणाले की, योग हे एक प्राचीन भारतीय विद्या आहे जे आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी अनेक फायदे देते. योगासने, श्वास घेण्याचे व्यायाम आणि ध्यान यांचा समावेश करून, योग आपल्याला एकूणच निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यास मदत करते. यावेळी त्यांनी विविध आसणे प्रात्यक्षिके करून दाखवली. या शिबिरास महिला-पुरुष युवक मोठ्या संख्येने लाभ घेताना दिसून येत आहेत.योगाचार्य सितारामजी सोनटक्के सोनटक्के गुरुजी यांच्या या निशुल्क कार्यामुळे परिसरात त्यांचे अभिनंदन होत आहे. सुमित मोरगे यांनी मोफत जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल योगाचार्यांनी त्यांचे आभार मानले.