येलूर तालुका कंधार येथील बालाजी व्यंकटेश शिंदे यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू

 

प्रतिनिधी, कंधार

तालुक्यात शनिवारी, १६ मार्च रोजी सायकांळी पाचच्या सुमारास वीजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. यात अंगावर वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. तर एक बैल दगावला आहे.

कंधार तालुक्यात शनिवारी, १६ मार्च रोजी अचानक वातावरणात बदल झाला.वीजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, येलूर येथील बालाजी व्यंकटेश शिंदे (वय २२) यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर शिरसी बुद्रुक येथील बालाजी ग्यानोबा कैलासे यांचा वीज पडून बैल दगावला. तसेच शिरूर येथील शिवाजी जाधव यांचे घर पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *