भगवानबाबा,विठ्ठल रुक्मिणी,व हनुमान मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहण मिरवणक कार्यक्रमाचे घोडज रोड कंधार येथे आयोजन

 

कंधार :दि.१७ मार्च रोज रविवारी भगवानबाबा,विठ्ठल रुक्मिणी,व हनुमान मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहण कार्यक्रम स्थळ-भगवान बाबा सेवाभावी प्रतिष्ठान घोडज रोड कंधार येथे आयोजित केला असून महंत ज्ञानाचार्य ह.भ.प नामदेव शास्त्री महाराज यांचे प्रवचन होणार आहे अशी माहिती आज शनिवार दि. 16 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता भगवान बाबा सेवाभावी प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ दिनकर जायभाये यांनी दिली व मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळी ९ ते ११ बसस्थानक ते शिवाजी चौक ते भगवानगड रथ मिरवणूक व कलशारोहण
११ ते १२ अभिशोक व कलशारोहण
०१ ते ०३ सभा तसेच महंत ज्ञानाचार्य ह.भ.प नामदेव शास्त्री महाराज यांचे प्रवचन होईल.

 

या कार्यक्रमास माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत,तरी या कार्यक्रमास पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन भगवान बाबा सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे,स्थळ-भगवान बाबा सेवाभावी प्रतिष्ठान घोडज रोड कंधार च्या वतीने डॉ दिनकर जायभाये यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *