खासदार चिखलीकर साहेब म्हणजे कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता 

 

राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते.कार्यकर्तेना बळ देणारा नांदेड जिल्ह्यात ऐकमेव नेता खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर 

राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते.नांदेड जिल्ह्यात लढाऊ वृत्ती आसलेल्या मन्याड खोर्यातील आस्सल ग्रामीण व गावरान नेता म्हणून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक कार्यकर्त्यांना घडविले.कै,शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर याचा सामाजिक व धार्मिक वारसाही चालू ठेवला.

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब म्हणजे प्रचंड ध्येयवाद,अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी नांदेड च्या राजकारणात जनमाणसांत वेगळे स्थान निर्माण केले आहे. महापूर, कोरोना यांसारख्या संकटात ते जनतेच्या मदतीला धावून जातात. जिल्ह्याच्या विकासाच्या नवनव्या संकल्पना ते मांडत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करण्याचे काम ते नेहमी करतात.
केवळ जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या खासदार चिखलीकर साहेब यानी वयाच्या १८व्या वर्षांपासून ते राजकारण, समाजकारण निरतंर करत आहेत.
2020 व 2021 मध्ये जगावर व राज्यासह जिल्ह्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटातही ते लोकांच्या मदतीला धावले. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्याला बऱ्याचअंशी यशही आले. महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रश्नांवर त्यांचे बारीक लक्ष असते. शहरातील लोकांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ते नेहमीच काम करीत असतात. नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांना बळ देण्याचेही ते काम करतात. पाणी, दुष्काळ, आरोग्याच्या प्रश्नासोबतच जिल्ह्याच्या विकासावर त्यांनी भर दिला आहे.
कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम खासदार चिखलीकर सहेब यांनी मोठ्या प्रमाणात केले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील तरुणांचे ते आशास्थान बनले आहेत. त्यातूनच आश्वासक आणि प्रेरक नेतृत्वाची साक्ष जनतेला पटली आहे.खासदार चिखलीकर साहेब यांच्याकडून जनतेला फार मोठ्या अपेक्षा आहेत. *जनतेच्या कसोटीवरही ते यशस्वी ठरो आणि नांदेड जिल्ह्याचे सातत्याने नेतृत्व करो. पून्हा 2024 मध्ये नांदेड लोकसभेचे सदस्य खासदार म्हणून विजयाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…*

*सुनिल रामदासी*
पत्रकार
9423136441

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *