संदीप शिवाजीराव जाधव यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या शहर उपाध्यक्ष पदी निवड…! राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड ग्रामीण मधील युवा मिशन 2024 कंधार तालुक्याची आढावा बैठक संपन्न

 

कंधार : प्रतिनिधी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड ग्रामीण (अजित पवार गटाचे ) चे जिल्हा अध्यक्ष संभाजी पाटील मुकनर यांच्या व जिल्हा कार्याध्यक्ष स्वप्नील पाटील इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कंधार येथे बैठक संपन्न झाली.. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज कागणे, नागेश यसगे वाल्मीक जाधव जिल्हा सरचिटणीस मनोराज म्हस्के बबलू पाटील देवकते व इतर युवक सोबत होते..

या आढावा बैठकीचे आयोजन कंधार युवकचे तालुका अध्यक्ष गणेश ठेवरे व शहर अध्यक्ष माधव मुंढे यांनी केले.. संदीप शिवाजीराव जाधव यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली दरम्यान 25 युवक पदाधिकारी यांच्या तालुका व शहर कार्यकारिणीत निवडी करण्यात आल्या त्यावेळी असंख्य युवक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *