उक्कडगावात भव्य सन्मान सोहळा आणि इंदुरीकर महाराजांचे किर्तन

अहमदपूर : ( प्रा भगवान आमलापुरे ) राणीसावरगाव परिसरातील मौजे उक्कडगाव येथे आज दि 22 मार्च 24 रोजी मातोश्री शोभाबाई आणि श्री गोपीनाथराव परतवाड यांच्या दिर्घायुष्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात सकाळी 10 : 00 वाजता हनुमान मंदिर येथे महारुद्राभिषेक, 11 ते 01 ह भ प विठ्ठल महाराज शिंदे यांचे किर्तन होणार आहे. या नंतर सायंकाळी 07 वाजता मातोश्री शोभाबाई आणि श्री गोपीनाथराव परतवाड यांचा सन्मान सोहळा पार पडणार आहे.

 

त्यानंतर 07 : 30 ते 09: 30 दरम्यान आघाडीचे किर्तनकार ह भ प निव्रती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सौ तेजश्री गजलवार आणि प्रा डॉ रमाकांत गजलवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *