कंधार : शहरातील विविध ठिकाणी गटारा वरची लोखंडी जाळी बसविण्यासाठी नगर पालीकेला निवेदन देण्यात आले.
१) विवेकानंद चौक, साईबाबा मंदिराकडे जाणारा मार्ग, २) मा. बालाजी नागुराव धोंडगे यांच्या घराजवळ, ३) व्यंकटेश नगर, मा. किशोर शेषराव क्षीरसागर यांच्या घरासमोरील गटारा वरची लोखंडी जाळी नसल्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी असल्यामुळे नागरिकांना व वाहनांना ये – जा करण्यासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे.
मुख्याधिकारी साहेबांना नम्र विनंती आहे, की याकडे तातडीने लक्ष द्यावेव नागरिकांची अडचण लवकरात लवकर दूर करण्यात यावे ही नम्र विनंती. असे निवेदन साईनाथ भगवानराव मळगे,सरोज संजय मोरे,
मोनीत संजय गायकवाड यांच्या सह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.