साहित्यिक देविदास फुलारी यांचा 24 मार्च रोजी विसावा पॅलेस  नांदेड येथे सत्कार

 

नांदेड : दिनांक 22
येथील प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी यांना महाराष्ट्र शासनाचा वर्ष 2022 – 23 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे अलीकडेच हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.
याचे औचित्य साधून नांदेडच्या ललित कला प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यिक देविदास फुलारी यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

नाना नानी पार्क जवळील विसावा पॅलेस येथे रविवार दिनांक 24 मार्च रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजता हा कार्यक्रम आयोजित केला असून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांचे शुभ हस्ते हा सत्कार होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ललित कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उद्योगपती श्री बालाजी इबितदार हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. शंकर विभुते , गजानन मुधोळ पाटील, डॉ. माधव बसवंते, दिगंबर कदम आणि महेश मोरे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कथाकार राम तरटे हे करणार आहेत.
तरी रसिकांनी या कार्यक्रमास वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन ललित कला प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *