कंधार : प्रतिनिधी
कंधार शहरातील फुलेनगर आंबेडकर चळवळीत मोठा सहभाग होता भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका सरचिटणीस ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त शिक्षक एन डी कांबळे यांचे दिनांक 22 मार्च रोजी दुपारी 1.30 मिनिटांनी दुःखद निधन झाले आहे त्यांचे मृत्यू समय वय 85 वर्षाचे होते.
कंधार पंचायत समितीचे मनरेगाचे अभियंता जितेंद्र कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे उर्फ बंडू कांबळे यांचे ते वडील व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे जळगाव येथील डीन डॉ.रमेश बनसोडे यांचे ते सासरे नांदेड महापालिका नगरसेविका सौ. चित्रा सिद्धार्थ गायकवाड यांचे वडील होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली नातू पंतू असा मोठा परिवार आहे त्यांचा अंत्यविधी कंधार येथील हिंदू समशान भूमी येथे आज दिनांक 23 मार्च रोज सकाळी 10 वाजता होणार आहे.