लोहा विधानसभा क्षेत्रातील १हजार ६७६ कर्मचाऱ्यांचे ४ तारखेला पाहिले प्रशिक्षण

 

 

(कंधार : दिगांबर वाघमारे )

लातूर लोकसभा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यात
७ मे रोजी मतदान होणार आहे .त्यासाठी लोहा विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचे पाहिले प्रशिक्षण ४ एप्रिल रोजी विक्की गार्डन पारडी लोहा येथे सकाळ व दुपार असा दोन सत्रात १ हजार ६७६ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी दिली
लोहा विधानसभा मतदार संघ लातूर लोकसभा (अ जा ) मतदार संघात होतो.३३०मतदान केंद्र असून लोहा तालुक्यात१८३ तर कंधार मध्ये १४७ मतदान केंद्र आहेत. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे, निवडणूक नायब तहसीलदार रेखा चामनार, नायब तहसीलदार संजय भोसीकर, अशोक मोकले, परळकर, पाठक तसेच निवडणूकीसाठी समन्वयक मन्मथ थोटे हे निवडणूक तयारी साठी दररोज दहा-बारा तास कामकाज बैठका करत आहेत
पारडी येथील विक्की गार्डन येथे दोन सत्रात सकाळी ९ ते ११ व दुपारी १ ते ३ वाजतेच्या दरम्यान निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे.ईव्हीएम मतदान यंत्र हाताळणी नारायणा इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल येथे दुपारी१ ते ३ व दुपार सत्रात ३ ते ५ असे प्रशिक्षण होणार आहे.मतदान केंद्राध्यक्ष ४००, मतदान अधिकारी -एक कर्मचारी -४२५, मतदान अधिकारी २ व ३ कर्मचारी ८२५ असे १ हजार ६७६ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झोनल अधिकाऱ्यांचे मंगळवारी प्रशिक्षण पार पडले.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार परळीकर, तहसीलदार गोरे व टीम निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी वेगवेगळ्या बैठका घेत आहेत.समन्वयक मन्मथ थोटे यांचे निवडणूक प्रक्रियेतील काम उल्लेखनीय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *