नो ब्रा डे असा कुठला तरी दिवस आहे असं काहीतरी वाचनात आलं आणि आठवलं आपल्या आई , आजी या ब्रा वापरत नव्हत्या तर पुर्वीच्या काळी कंचुकी / काचोळी / चोळी वापरली जायची..त्यावर त्या साडी नेसायच्या त्यामुळे त्यांना ब्रा ची especially paded bra ची गरज लागली नाही.. कालांतराने ट्रांसपरन्ट ड्रेसेस आले आणि ब्रा ची गरज जाणवु लागली .. त्यानंतर ब्लाउजलाच पॅडींग करुन डीप नेक आला..
बेल्ट नसलेल्या ब्रा आल्या.. अनेक नवनवीन डीझाईन मार्केटमधे येत राहील्या आणि आपण ते वापरत आहोत.. ब्रा न वापरता रहाणं नक्कीच शक्य आहे पण मग घातला जाणारा ड्रेस जाड कापडाचा हवा कारण आपण वेस्टर्न वर ओढणी घेत नाही.. आताही पॅडींग लावुन कंचुकी मार्केट मधे फॅशन म्हणुन आली आहे.. f. C. Rd. वर ३५० रुपयात छान कंचुकी मिळतात आणि फीटींग एकच नंबर असतं आणि उत्तम फिगर असेल तर त्यावर सारी वेअर केली तर अतिशय सुंदर असा लुक येतो.. सगळं अवलंबून असतं ते आपल्या फिगरवर आणि कॅरी करण्यावर.. कंचुकी चा मागे पाठीवर लोळणारा गोंडा हा पाठीमागच्या सौंदर्यात भर घालतो ..
कंचुकीच्या दोन बाजूच्या बेल्ट चे फुल कसे बांधायचे हेही स्कील आहे आणि त्यावर प्लेन शिफॉन सारी उत्तम दिसते.. कमीतकमी पैशात वेगळी फॅशन .. मी कंचुकी आणि स्कर्ट घालून एक फोटो शेअर केला होता त्यावर एका सखीची कमेंट वाचली , ” तिने लिहीलं होतं , वयानुसार कपडे वापरावेत.. कदाचित त्या बिचारीला वापरता येत नसावेत .. पूर्वीच्या काळी सगळ्या स्त्रीया कंचुकी वापरायच्या मग आता पोटदुखी का असावी ??.. तुम्हाला फॅशन करायला कोणी नको म्हटलं नाही पण त्यासाठी व्यायाम करा कारण ओबडधोबड शरीरावर असे कपडे सुट होत नाहीत.. जेलसी न करता घेता येत असेल तर आनंद घ्या .. सगळ्या फॅशन जुन्याच आहेत त्या नवीन रुपात पुन्हा येत आहेत मग आपला मागासलेपणा दाखवून काय सिध्द होणार ना त्यापेक्षा आपल्याकडे जे नाही ते कसं मिळवता येइल यासाठी प्रयत्न करावेत.. काल होळी होती तरीही मी दीढ तास टेकडी चढून आले होते .. हे करायला जमतं का पहा.. गॉसीपींग करणं खूपच सोप्पं आहे..
माझा मित्र मला सांगत होता त्याच्या दोन मैत्रीणी सोबत असल्या की गाडीत फक्त तुझ्या ड्रेसचाच विषय असतो कारण त्यांना ते शोभत नाही आणि त्या स्वतःला कॅरी करु शकत नाहीत .. त्या माझ्याविषयी गॉसीपींग करुन त्यांचा मौल्यवान वेळ वाया घालवतात त्याबदल्यात त्यांना तेच रीटर्न मिळणार आहे याची जाणीव नसावी याची कमाल वाटते.. घटकंचुकी यावर मी पूर्वी लिहीले होते.. पुर्वी हा खेळ राजेराजवाड्यात खेळला जायचा.. घट म्हणजे माठ आणि कंचुकी म्हणजे आताची ब्रा किवा पुर्वीची चोळी.. त्या माठात स्त्रीया आपल्या कंचुकी काढून ठेवायच्या आणि ज्याच्या हाताला जीची कंचुकी लागेल त्या दोघांनी एकत्र रात्र घालवायची..अध्यात्माच्या दृष्टीने हा नक्कीच व्यभिचार होता आणि आहे .. wife swapping हा आताच्या काळातला त्यातलाच प्रकार आहे.. चोळी / कंचुकी / ब्रा / काचोळी या शब्दांना इतिहास आहे आणि तितकच महत्वही आहे आणि सौंदर्यही आहे फक्त आपली दृष्टी चांगली हवी. विचारसरणी चौफेर हवी.. अध्यात्म आणि लैगिंकता याची सांगडही काही जणीना टोचते कारण त्यांची आकलन क्षमताच लहान आहे..
सोच बदलो.. देश बदलेगा..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi