मतदार जागृती अभियान अंतर्गत 41-लातूर लोकसभा निवडणुकीसाठी लोहा व कंधार तालुक्यातील 612 शाळात रंगभरण स्पर्धा

 

कंधार : 41-लातूर लोकसभा निवडणुकीसाठी लोहा व कंधार तालुक्यातील जि. प. प्राथमिक व माध्यमिक शाळा,खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये मतदार जागृती मोहिमेअंतर्गत रंगभरण स्पर्धा संपन्न झाली. लोहा तालुक्यातील 200 जिल्हा परिषद च्या प्राथमिक व माध्यमिक आणि 100 खाजगी अनुदानित विनानुदानित शाळा तसेच कंधार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 187 प्राथमिक व माध्यमिक आणि 125 खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. विद्यार्थ्यांनी मतदारांचे मतदान करण्याविषयीचे संदेश घरोघरी पोहोचविण्याचे पवित्र कार्य या स्पर्धेतून केले. अशी माहिती आज गुरुवार दि.28 मार्च रोजी दुपारी 2 वाजता मतदार जागृती पथक कक्ष प्रमुख गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी दिली.

 

 

41-लातूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी 88- लोहा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत लोहा व कंधार तालुक्यामध्ये उपविभागीय अधिकारी सौ.अरुणा संगेवार, लोहा तहसीलचे तहसीलदार विठ्ठल परळीकर साहेब आणि कंधार तहसीलचे तहसीलदार रामेश्वर गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जागृती पथक कक्ष प्रमुख गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे,केंद्रप्रमुख एन.एम.वाघमारे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशिनाथ ,नवनाथ बोळकेकर,माधव भालेराव, एम.एन.घुगे व डी.एन. मंगनाळे यांची टीम मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांतर्गत मतदानाचे संदेश घरोघरी पोहोचण्यासाठी कार्यरत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *