नांदेड :भाजपा लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी झाले तेव्हापासून नांदेड लोकसभा कार्यालय प्रमुख तथा भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आपला बाडबिस्तारा कार्यालयात हलवला आहे .
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व प्रतापराव पाटील चिखलीकर हे खासदार होण्यासाठी ठाकूर हे २४ तास प्रचारासाठी देत असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.*
यापूर्वी दिलीप ठाकूर यांनी १९९५ व १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाशभाऊ खेडकर तसेच २००४ ला अनुसयाताई खेडकर यांच्या निवडणुकीत पूर्ण वेळ उपस्थित राहून प्रचार यंत्रणा राबविली होती.२००४ च्या लोकसभा निवडणुकीत डी बी पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे प्रमुख म्हणून पूर्णवेळ काम पाहिले.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देखील खा. चिखलीकर यांच्या प्रचारार्थ ३५ दिवस गोदावरी हॉटेलच्या प्रचार कार्यालयात तळ ठोकला होता. दिलीप ठाकूर यांचा निवडणुकीचा पूर्व अनुभव पाहून या निवडणुकीत देखील त्यांच्यावर खा. चिखलीकर यांनी प्रचार कार्यालयाची जबाबदारी सोपवली आहे. चिखलीकर यांचे बोरबन भागात अतिशय अद्यावत प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात संगणक विभाग, वार रूम, पत्रकार परिषद कक्ष, भांडार कक्ष, कॉल सेंटर, बैठक कक्ष या सहित अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कार्यालयात येणाऱ्या अभ्यागताना व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी कर्मचारी व पक्षाचे पदाधिकारी मिळून २१ ची टीम कार्यालयात कार्यरत आहेत. छोट्या-मोठ्या बैठका घेण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. या कार्यालयामार्फत संपूर्ण नांदेड लोकसभा मतदारसंघात दैनंदिन संपर्क करण्यात येतो. खा. चिखलीकर व इतरांच्या दौऱ्यांचे नियोजन करण्यात येते. वाहन परवाना, सभा, रॅली
यांच्या परवानग्या काढण्यात येतात. रोजच्या खर्चाचे विवरण निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येते. वृत्तपत्रात आलेल्या रोजच्या बातम्यांचे संग्रह करण्यात येते. २९९४९९ हा नवीन दूरध्वनी क्रमांक निवडणूक कालावधीसाठी कार्यालयात घेण्यात आला आहे. मतदारांनी अधिक माहितीसाठी या दूरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन दिलीप ठाकूर यांनी केले आहे.